परभणी (दि.12 ऑक्टोंबर): संयुक्त राष्ट्र संघाने घोषित केल्यानुसार राज्य आणि जिल्हास्तरावर दरवर्षी 13 ऑक्टोबर हा दिवस ‘आपती धोके निवारण दिवस’ म्हणून साजरा करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. त्यामुळे दरवर्षी हा दिवस ‘आपत्ती धोके निवारण दिवस’ म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानिमित्त उद्या शुक्रवारी सकाळी 11 वाजता सर्व शासकीय कार्यालयांमध्ये अधिकारी- कर्मचाऱ्यांकडून प्रतिज्ञा घेण्यात येणार असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती अनुराधा ढालकरी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
राष्ट्रीय आपती व्यवस्थापन प्राधिकरण, नवी दिल्ली यांनी नागरिकांना आपत्ती प्रतिसादासाठी कटिबद्ध होण्यासंदर्भात यंदा प्रतिज्ञा तयार केली असून ही प्रतिज्ञा सर्व शासकीय कार्यालयात आयोजित करण्याचे सूचित केले आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणोच अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांना त्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे शुक्रवार, (दि.13) रोजी जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयामध्ये सकाळी 11 वाजता आपती प्रतिसादासाठी कटिबद्ध होण्यासंदर्भात प्रतिज्ञा घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिले आहेत.......
*****
0 टिप्पण्या