🌟बा विठ्ठला मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसले ले श्री मनोज जंरागे-पाटील यांच्या मागणीला यश दे.....!


🌟परभणी जिल्ह्यातील किर्तन केसरी हभप.अच्युत महाराज दस्तापुरकर यांनी श्री क्षेत्र पंढरपूरात विठ्ठल रुक्मिणीला घातले साकडे🌟


मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले श्री मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीला यश दे असे साकडे महाराष्ट्रातील कीर्तनकार ह.भ.प. अच्युत महाराज दस्तापुरकर यांनी शनिवार दिनांक 28 रोजी दुपारी दोन वाजता पंढरपूर येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची पूजा करून त्यांनी हे साकडे घातले आज महाराष्ट्रात मराठा समाज रस्त्यावर उतरलेला आहे आणि या त्यांच्या मागणीसाठी बऱ्याच मराठा बांधवांनी आत्महत्या करुन जिवन संपवलं आहे .माझी सर्व मराठा बांधवांना विनंती आहे की आपण हे टोकाचे पाऊल उचलू नयेत आपण एकोप्यानं आरक्षण देण्यासाठी रस्त्यावर उतरुत असे  ह.भ.प. अच्युत महाराज दस्तापुरकर यांनी सांगितले आहे.

त्यांच्या सोबत सामाजिक कार्यकर्ते तुकाराम सदाशिव ढोणे पाटील.भागवत शिंदे यांच्या सह उपस्थित होते


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या