🌟गंगाखेड तालुक्यातील मैराळ सावंगीतील तरुणाची आरक्षणासाठी आत्महत्या.....!

 


🌟मयत जाधव हे मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ मराठा आरक्षणाच्या चळवळीत काम करत होते🌟

परभणी (दि.३१ ऑक्टोंबर) : गंगाखेड तालुक्यातील मैराळ सावंगी येथील ३० वर्षीय अशोक रंगनाथराव जाधव या तरुणाने गोदावरी नदीच्या पात्रात उडी मारुन आत्महत्या केली.

            दि.२५ ऑक्टोंबर रोजी रात्रीपासून अशोक जाधव हे घराबाहेर पडले. कुटूंबियांसह ग्रामस्थांनी शोध घेतला. सोनपेठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्या दरम्यान गावालगतच्या गोदावरी नदीच्या पात्रात या तरुणाचा मृतदेह आढळून आला.

             दरम्यान, जाधव हे आंतरवाली सराटी येथे उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ आरक्षणाच्या चळवळीत काम करत होते. सभेस हजर होते. आरक्षणासाठीच्या चळवळीला वाहून घेतले होते. त्यांच्या या आत्महत्येने गावात शोककळा पसरली आहे........

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या