🌟शिवसेना (शिंदे) अल्पसंख्यांक प्रदेश उपाध्यक्ष मो.हाजी कुरेशी यांनी घेतली पालकमंत्री संजय बनसोडे यांची सदिच्छा भेट...!


🌟परभणी जिल्ह्यातील गंगाखेड विधानसभा मतदार संघातील पुर्णा पालम तालुक्यांच्या विकासा संदर्भात केली चर्चा🌟 

मुंबई (दि.१७ ऑक्टोंबर) - शिवसेना अल्पसंख्यांक विभागाचे महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्ष तथा पुर्णा नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष मो.हाजी कुरेशी यांनी काल सोमवार दि.१६ ऑक्टोंबर २०२३ रोजी मुंबई येथे परभणी जिल्ह्याचे पालक मंत्री तथा राज्याचे पर्यावरण, पाणी पुरवठा व स्वच्छता,सार्वजनिक बांधकाम मंत्री सदिच्छा भेट घेतली.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष हाजी कुरेशी यांनी मा.ना.संजय जी बनसोडे यांची परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावर निवड झाल्याबद्दल त्यांचा शिवसेना अल्पसंख्यांक विभाग व गंगाखेड विधानसभा मतदार संघाच्या वतीने सत्कार केला यावेळी त्यांनी परभणी जिल्ह्यातील गंगाखेड विधानसभा मतदार संघातील पुर्णा पालम तालुक्यांच्या विकासा संदर्भात यावेळी पालकमंत्री मा.ना.बनसोडे यांच्याशी चर्चा केली यावेळी त्यांच्या सोबत माजी नगरसेवक शशीकांत जगताप हे देखील उपस्थित होते......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या