🌟मराठा योद्धा मनोज जरांगे यांची संत तुकाराम महाविद्यालयाच्या मैदानावर आज जाहीर सभा....!


🌟समर्थनार्थ उपोषणकर्त्यांचा जाहीर सत्कार🌟

परभणी (प्रतिनिधी) - सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे या मागणीसाठी अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी 17 दिवस अमरण उपोषण करून सरकारला धारेवर धरले. त्यानंतर मनोज जरांगे यांच्याकडून  सरकारने मराठा आरक्षणासाठि 40 दिवसाचा कालावधी मागुन घेतला. त्यामुळे मराठा योद्धा मनोज जरांगे यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाचा लढा यशस्वी करण्यासाठी मराठा समाजासोबत समन्वय साधुन पुढील आंदोलनासाठी दिशा निश्चित करता यावी यासाठी 30 सप्टेंबर ते 11ऑक्टोबर पर्यंत मराठवाडा दौरा सुरू केला आहे. त्याअनुषंगाने मनोज जरांगे पाटिल यांची शहरातील वसमत रोडवर असलेल्या संत तुकाराम महाविद्यालयाच्या मैदानावर आज सोमवार(दी.2) रोजी दुपारी 1 वाजता जाहिर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यादरम्यान असोला परिसरातील वसमत रोडवर असलेल्या मॉसाहेब जिजाऊ मंदिर येथे दुपारी 12.30 वाजता राष्ट्रमाता जिजाऊ यांचे दर्शन घेऊन भव्य मोटर सायकल रॅली द्वारे सभा स्थळी आगमन होणार आहे. त्यावेळी त्यांचे प्रचंड आतिषबाजी द्वारे भव्य स्वागत करण्यात येणार आहे. त्याचबरोबर परभणी जिल्ह्यातील ज्या उपोषणकर्त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ उपोषण केले त्या उपोषणकर्त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.त्यानंतर मराठा योद्धा मनोज जरांगे पाटिल  उपस्थित असलेल्या परभणी जिल्ह्यातील हजारो मराठा समाज बांधवांना मराठा आरक्षण विषयी मार्गदर्शन करणार आहेत. या ऐतिहासिक जाहीर सभेला उपस्थित राहण्याचे आवहान सकळ मराठा समाज बांधवांच्या वतीने करण्यात आले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या