🌟गंगाखेडचे आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी मराठा आरक्षण व धनगर समाज आरक्षणासाठी केले एकदिवसीय अन्नत्याग उपोषण...!


🌟आरक्षण विषयी राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन तात्काळ बोलवा - आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे 


गंगाखेड विधानसभेचे लोकप्रिय व कर्तव्यदक्ष आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी मराठा व धनगर आरक्षणाच्या समर्थनार्थ मौजे.बनपिपळा येथील निवासस्थानी शेकडो कार्यकर्त्यांसह एकदिवसीय अन्नत्याग उपोषण केले. 

मराठा व धनगर समाजाला त्यांच्या हक्काचे आरक्षण मिळाले पाहिजे, हि माझी कायम भूमिका राहिली आहे.‌ त्या दृष्टीने मी वेळोवेळी स्पष्टता सुध्दा केली आहे. सध्या महाराष्ट्राभर मराठा व धनगर आरक्षणाचा विषय ऐरणीवर आला आहे. त्यासाठी श्री.मनोज जरांगे पाटील हे मौजे.आतंरवाली सराटी येथून तर धनगर आरक्षणासाठी श्री.सुरेश बंडगर व यशवंत सेनेने मौजे.चौंडी येथे एल्गार पुकारला आहे. त्यामुळे दोन्ही समाजाच्या मागण्यांना बिनशर्त व जाहीर पाठींबा देण्यासाठी हे उपोषण करीत असल्याचे, लोकप्रिय आ.डॉ.रत्नाकर गुट्टे साहेब यांनी स्पष्ट केले.


 मराठा समाजाचा ओबीसीत तर धनगर समाजाचा अनुसूचित जमाती मध्ये समावेश करावा यासाठी सुरू असलेला हा लढा अधिक तीव्र होत आहे. त्यामुळे आरक्षण विषयी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन तात्काळ बोलवा अशी स्पष्ट मागणी संवेदनशील आ.डॉ.रत्नाकर गुट्टे साहेब यांनी राज्य शासनाकडे केली आहे.

आरक्षणामुळे महाराष्ट्रात नेत्यांना गावबंदी केली आहे. गंगाखेड विधानसभा सुध्दा त्यास अपवाद नाही. त्यामुळे समाजाच्या भावना लक्षात घेऊन इतर ठिकाणी न जाता मी माझ्या घरीच एकदिवसीय अन्नत्याग उपोषण करून बिनशर्त पाठींबा दिला आहे.‌ त्यामुळे कोणत्याही बांधवांनी चुकीचा अर्थ काढून गैरसमज करून घेऊ नये. मराठा व धनगर आरक्षणाच्या बाजूने मी कालही होतो, आजही आहे आणि उद्याही असेन, अशीही ग्वाही कर्तव्यदक्ष आ.डॉ.रत्नाकर गुट्टे साहेब यांनी दिली. 


या अन्नत्याग उपोषणाची सांगता तालुका प्रशासनाच्या वतीने उपविभागीय अधिकारी जिवराज डापकर आणि पोलीस उपअधीक्षक डॉ.दिलीप टिपरसे यांच्या हस्ते विकासरत्न आ.डॉ.रत्नाकर गुट्टे साहेब यांना नारळपाणी पाजून झाली. अतिशय शांततेत उपोषण केल्यामुळे उपविभागीय अधिकारी डापकर यांनी समाधान व्यक्त केले. याप्रसंगी मी मराठा व धनगर आरक्षण समर्थनाचे निवेदन स्थानिक प्रशासनाकडे सोपविले. 

सामाजिक बांधिलकीचा संदेश देणाऱ्या या उपोषणात राष्ट्रीय समाज पक्ष व आ.डॉ.रत्नाकर गुट्टे (काका) मित्र मंडळाचे सर्व वरिष्ठ पदधिकारी, कार्यकर्ते तसेच समर्थक, हिंतचिंतक आणि मराठा व धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या