🌟आज मंगळवार दि.३१ ऑक्टोंबर पासून आमरण उपोषणाला सुरूवात🌟
पुर्णा (दि.३१ ऑक्टोंबर) - मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी क्रांतिकारी मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील हे अंतरवेली सराटी येथे उपोषणाला बसले आहेत त्यांना पाठिंबा देण्यासाठी सुहागन येथील महिला पुरुष आमरण उपोषणाला बसले आहेत सध्या महाराष्ट्रात आगडोंब उसळला असून मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी महाराष्ट्र धकधगत आहे.
सरकारला या गोष्टीकडे गांभीर्याने पहावे लागणार असून मराठ्यांना लवकरात लवकर आरक्षण मिळावे यासाठी पुर्णा तालुक्यातील सुहागन येथे आज मंगळवार दि.३१ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी ११-०० वाजता आमरण उपोषणाला सुरूवात करण्यात आली असून परसराम भोसले,दामाजी भोसले,सुंदराजी भोसले,भुजाजी भोसले,कुशावर्ता भोसले,गोदावरी भोसले,रुख्मिण भोसले आदी मान्यवर उपोषणाला बसले आहेत महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण द्यावे व अंतरवेली सराटी येथे लाठीचार्ज झाला होता त्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावे अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे......
0 टिप्पण्या