🌟गंगाखेडच्या गोदाकाठी रंगला आतिषबाजीसह कला महोत्सव.....!

  


🔹अपप्रवृत्तींचे दहन हीच खरी विजयादशमी - आ.डॉ.रत्नाकर गुट्टे🔹


गंगाखेड : साईसेवा प्रतिष्ठाणने आयोजीत केलेला गोदाकाठावरील दसरा महोत्सव नागरिक अबालवृद्धांच्या प्रचंड प्रतिसादात संपन्न झाला. आतिषबाजी, कलाकारांनी सादर केलेल्या विविध कलाविष्कारांना प्रेक्षकांची जोरदार दाद मिळाली. समाजात असलेल्या अपप्रवृत्तींचे दहन होणे, हीच खरी विजयादशमी असल्याचे प्रतिपादन गंगाखेडचे आ. डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी या प्रसंगी बोलताना केले.


 
गंगाखेडचे ऊपविभागीय अधिकारी जिवराज डापकर, पोलीस ऊपअधिक्षक दिलीप टीपरसे, तहसीलदार प्रदीप शेलार, पोलीस निरीक्षक कुंदन वाघमारे,  मुख्याधिकारी जयवंत सोनवणे आदि प्रमुख प्रशासकीय अधिकाऱ्यांसह बाजार समितीचे माजी सभापती बाळकाका चौधरी, सभापती साहेबराव भोसले, आ. गुट्टे मित्रमंडळाचे जिल्हाध्यक्ष प्रल्हाद झोलकर, रासपा जिल्हाध्यक्ष ॲड संदिप पाटील. माजी जि. प. सदस्य किशनराव भोसले, कॉंग्रेस जिल्हा ऊपाध्यक्ष ॲड संतोष मुंडे, जेष्ठ व्यापारी अनिल यानपल्लेवार, माजी नगरसेवक सत्यपाल साळवे, ॲड. कलीमभाई, राधाकीशन शिंदे, दिपक तापडिया, राजेश दामा, कृष्णाजी सोळंके, संतोषराव ऊंबरकर, संयोजक तथा साईसेवा प्रतिष्ठाणचे अध्यक्ष गोविंद यादव आदिंची मंचावर ऊपस्थिती होती. ग्रामिण पत्रकार संघाचे सं. अध्यक्ष रमेश कातकडे, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष राहुल डोंगरे यांच्या हस्ते कला महोत्सवाचे ऊद्घाटन करण्यात आले. 


प्रिभूषन नृत्य अकादमी, स्टार डान्स स्टुडीओच्या कलाकारांनी एकापेक्षा एक सरस नृत्य सादर करून ऊपस्थितांची मने जिंकली. तर जि. प. प्रा. शा. शिवाजीनगर तांडा येथील विद्यार्थीनींच्या संत सेवालाल ग्रुप ने सादर केलेल्या पारंपारिक लोकनृत्याने प्रेक्षकांना ठेका धरायला भाग पाडले. गंगाखेडच्या शिक्षण आणि क्रिडा क्षेत्रात यश मिळविलेले चंद्रकांत बिडगर, गौरी जोशी, अदनान पटेल, निकीता लंगोटे, गौरी चेऊलवार यांचा पालकांसह गौरव करण्यात आला. तर स्वखर्चातून पुरातन वेस दुरुस्ती करणारे सदानंद जोशी व न. प. स्वच्छता निरीक्षक शिवाजी हजारे यांचा ऊत्कृष्ट कार्याबद्दल सत्कार करण्यात आला. शोभेच्या दारूगोळ्यानंतर अप्रवृत्तीच्या ५१ फुटी पुतळ्याचे ‘व्यंकटरमना गोविंदा, सिंयावर रामचंद्र की जय’ च्या जयघोषात दहन करण्यात आले. 

आ. डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी आपल्या मनोगतातून शहर आणि मतदार संघात होत असलेल्या विकास कामांची माहिती दिली. तसेच भविष्यात होवू घातलेल्या योजना सांगत विकास कामांत कोणीही विरोध न करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गोविंद यादव यांनी, सुत्रसंचालन दत्ता जोशी यांनी तर आभार प्रदर्शन भगत सुरवसे, मनोज नाव्हेकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गोविंद यादव, नागेश पैठणकर, संजयलाला अनावडे, संतोष तापडीया, नंदकुमार भरड, गजानन महाजन, कल्याण तुपकर, मनोज नाव्हेकर, रमेश औसेकर, बालासाहेब यादव, हाजी गफार शेख, संदीप कोटलवार, किरण जोशी, सचिन नाव्हेकर, गुंडेराव देशपांडे, बालासाहेब यादव, जगदिश तोतला, राजेंद्र पाठक, पंकज भंडारी, राजू गळाकाटू, कारभारी निरस, हरीभाऊ सावरे, मनमोहन झंवर, दिलीप सोळंके, कृष्णा पदमवार, अभिनय नळदकर, अंबादास राठोड, अतुल गंजेवार, भगत सुरवसे, गोविंद रोडे, बंडू वडवळकर, राजू लांडगे, बाळासाहेब राखे, गजानन जोशी, अमोल कोकडवार, अतुल तुपकर, मकरंद चिनके, शाम कुलकर्णी, कैलास वाघमारे, नरेंद्र नळदकर, अहेमद खान गुत्तेदार, व्यंकटेश यादव, सुहास देशमाने, किरण यादव, प्रथम यादव, एलाप्पा शंकुवाड, राजू गोरे, राजू यादव, सागर गोरे, आदिंसह प्रतिष्ठाणच्या सदस्यांनी परीश्रम घेतले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या