🌟मराठवाडा दुष्काळमुक्त व्हावा अन्नदाता शेतकऱ्यांवरील संकट दुर व्हावे याकरिता महाकाल केदारनाथांना साकडं घालणार🌟
पुर्णा (दि.०२ ऑक्टोंबर २०२३) - पुर्णा येथील महाकाल समितीचे राजेश शामलाल रौत्रे, अनिल पदमगिरवार यांच्या नेतृत्वाखालील जत्था काल शनिवार दि.०२ ऑक्टोंबर २०२३ रोजी दुपारी १२-०० वाजता पुर्णा जंक्शन रेल्वे स्थानकावरून रवाना झाला या जत्थ्यात हुजूर साहिब नांदेड येथील दहा तिर्थयात्रींचा समावेश आहे.
महाकाल समितीचे राजेश शामलाल रौत्रे पुर्णावाले यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना असे सांगितले की या जत्थ्यात तब्बल बारा जनांचा समावेश असून यात नांदेड येथील मित्र परिवारातील दहा तिर्थयात्रींचा समावेश आहे आज रविवार दि.०२ ऑक्टोंबर रोजी मथुरा येथे मुक्काम करून उद्या ०३ ऑक्टोंबर रोजी हरिद्वार येथील गंगा आरतीसह मनसा देवीचे दर्शन घेऊन दि.०४ ऑक्टोंबर रोजी केदारनाथ धाम येथे दर्शनासाठी रवाना होणार आहेत केदारनाथ येथील तिन दिवसांच्या मुक्कामानंतर दि.०७ ऑक्टोंबर रोजी बद्रीनाथ धाम येथे दर्शनासाठी रवाना होणार असल्याचे व या परिसरातील सर्व धार्मिक तिर्थक्षेत्रांचे दर्शन घेऊन दि.१० ऑक्टोंबर रोजी घरवापसी करणार असल्याचेही राजेश यादव म्हणाले मराठवाडा दुष्काळमुक्त व्हावा अन्नदाता शेतकऱ्यांवरील संकट दुर व्हावे याकरिता महाकाल केदारनाथांना साकडं घालणार असल्याचे यादव यावेळी म्हणाले.
या जत्थ्यात कपिल यादव,धनेश चौधरी,बालु रत्नपारखे,हर्ष यादव,आकाश यादव,कपिल लोंढे,कैलाश बरंडवार,कैलाश बंडेवार,राजेश शामलाल रौत्रे,अनिल पदमगिरवार आदींचा समावेश आहे.....
0 टिप्पण्या