🌟भुसावळ तालुक्यातील वरणगाव फॅक्टरीत जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागातील कर्मचाऱ्याचा निर्घृण खून...!


🌟आरोपी दीपक सिंग राहणार वरणगाव ऑडनन्स फॅक्टरी यास वरणगाव पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले आहे🌟

जळगाव/भुसावळ : जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातल्या वरणगाव फॅंक्टरी येथील सुशील नगर सर्कलनजीक दोन जिवलग मित्रांमध्ये झालेला किरकोळ वाद विकोपाला जाऊन एका मित्राने दुसऱ्या मित्राच्या डोक्यात जोरदार काठीचा वापर केल्यामुळे त्या मित्राचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी व धक्कादायक घटना रविवार दि.१५ ऑक्टोंबर २०२३ रोजी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत ५८ वर्षीय प्रमोद ज्ञानेश्वर महाजन राहणार शिवाजीनगर, वरणगाव यांचा मृत्यू झाला. खून प्रकरणी संशयित आरोपी दीपक सिंग वय ५० वर्ष राहणार वरणगाव ऑडनन्स फॅक्टरी यास वरणगाव पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले आहे.

मुक्ताईनगरातील ८१ गाव पाणीपुरवठा विभागात कर्मचारी असलेले प्रमोद महाजन हे आपल्या एका मित्रासोबत वरणगाव फेक्टरीतील सुशील नगर सर्कलवर आल्यानंतर त्यांची संशयित आरोपी तथा मित्र असलेल्या दिपक सिंग सोबत भेट झाली. यावेळी गप्पांमध्धे जुना वाद उकरून निघाल्यानंतर दोघांमध्ये बाचाबाची झाली व काहींनी मध्यस्थी केल्यानंतर वाद मिटला. याप्रसंगी प्रमोदचे काका मनोहर महाजन, माजी सरपंच निर्तीन सोनवणे संदीप चौधरी, सुधाकर चौधरी, हिवरे यांनी सोड़वासोड़व केली. मात्र पुन्हा कुरापत निघाल्यानंतर संशयित दिपक सिंगने काठीचा फटका प्रमोद महाजन यांच्या डोक्यावर मारताच घाव वमी लागताच त्यांचा मृत्यू झाला. उपस्थित असलेल्या व्यक्तीनी त्यास फॅक्टरी दवाखान्यात नेले असता तेथील डॉ. राजरन्न तायड़े यांनी प्रमोद महाजन यांना मृत घोषित केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या