🌟पुर्णेतील क्रिडा शिक्षक सज्जन जयस्वाल यांना क्रिडा क्षेत्रात भरीव कामगिरी केल्याबद्दल मिळाला मराठवाडा क्रीडा रत्न पुरस्कार....!


🌟क्रिडा क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य करून जयस्वाल यांनी अनेक विद्यार्थी राज्य व राष्ट्रीय पातळीवर नेऊन आपल्या तालुक्याची शान वाढवली🌟                     

परभणी/पुर्णा (दि.०४ ऑक्टोंबर) - महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीचे निमित्त साधून लोहा तालुक्यात धावरी या नगरीत दि.०२ ऑक्टोंबर २०२३ रोजी मराठवाडा क्रीडा रत्न पुरस्कार सोहळा संपन्न झाला यामध्ये पुर्णा तालुक्याचे क्रीडा शिक्षक सज्जन जयस्वाल यांना क्रीडा रत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला या पुरस्कारासाठी सर्व मराठवाड्यातील जिल्ह्यातून अनेक क्रीडा शिक्षक यांचाही गौरव करण्यात आला क्रीडा क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य करून अनेक विद्यार्थी राज्य व राष्ट्रीय पातळीवर नेऊन आपल्या तालुक्याची शान वाढवली या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी लोह्याचे आमदार श्यामसुंदर शिंदे तसेच टोकियो ऑलिंपिक निरीक्षक अशोक दुधारे, जिल्हा नियोजन समिती सदस्य सिने अभिनेते एकनाथ मोरे राष्ट्रीय क्रीडा संघटक दीपक निकम या सर्वांच्या हस्ते सज्जन हिरालाल जयस्वाल  यांचा क्रीडा रत्न सन्मान चिन्ह व सन्मानपत्र   देऊन गौरव करण्यात आला यासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर दत्तात्रय वाघमारे उपाध्यक्ष भीमरावजी कदम सचिव श्रीनिवास काबरा  काकडे साहेब उत्तमराव कदम साहेबराव कदम डॉक्टर विनय वाघमारे बी बी मोरे जिल्हाप्रमुख विशाल कदम शहर प्रमुख मुंजाभाऊ कदम बंटी कदम शाम कदम मुख्याध्यापक डी एल उमाटे मुख्याध्यापिका अतिया मॅडम प्रकाश रौंदळे रावसाहेब हानवते सदाशिव बोबडे प्रकाश बनाते गोविंद गिराम कृष्णा कमळू संजय कदम विशाल सोलव रवी बिछडे सोनू सिंग बहोत मुन्ना राठोड उमेश झरकर तसेच पूर्णा येथील सर्व मित्र परिवाराने त्यांचे अभिनंदन केले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या