🌟या चर्चासत्राच्या उद्घाटनासाठी अध्यक्षस्थानी नूतन विद्यामंदिर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हेमंतराव जामकर होते🌟
परभणी : परभणी येशील के. सौ.कमलताई जामकर महिला महाविद्यालयात केंद्रीय हिंदी संस्थान आग्रा उत्तर प्रदेश व हिंदी विभाग कै.सौ.कमलताई जामकर महिला महाविद्यालय परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने दि.23 ऑक्टोबर 2023 रोजी एकदिवसीय राष्ट्रीय हिंदी चर्चासत्र यशस्वीपणे संपन्न झाले.
या चर्चासत्राच्या उद्घाटनासाठी अध्यक्षस्थानी नूतन विद्यामंदिर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. हेमंतराव जामकर व उद्घाटक म्हणून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथील प्र. कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंग बिसेन उपस्थित होते. या उद्घाटन प्रसंगी बोलताना डॉ. बिसन यांनी प्रवासी हिंदी साहित्य भारतीय हिंदी साहित्याला समृद्ध करणारे साहित्य असल्याचे वक्तव्य केले. या चर्चा सत्रासाठी बीजवक्ता म्हणून कर्नाटक विद्यापीठाच्या हिंदी विभागाचे अध्यक्ष डॉ. संदीप रणभिरकर उपस्थित होते. तसेच विशेष उपस्थिती केंद्रीय हिंदी संस्थान हैदराबाद केंद्राचे क्षेत्रीय निदर्शक डॉ. गंगाधर वानोडे यांची होती.
या चर्चासत्रामध्ये एकूण तीन सत्रात प्रवासी हिंदी साहित्याच्या वेगवेगळ्या पैलूंवर सखोल चर्चा झाली. विषयाच्या अनुषंगाने संशोधकांनी आलेख वाचन केले . या चर्चासत्रासाठी
तेलंगाना महिला विद्यापीठ हैदराबाद येथून डॉ. राजश्री मोरे तसेच स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या हिंदी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. सुजितसिंह परिहार तसेच या अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ. संतोष येरावार, डॉ .संजय नरवाडे, डॉ. बबन बोडके व यशवंत महाविद्यालयाचे हिंदी विभाग प्रमुख डॉ. संदीप पाईकराव उपस्थित होते . या चर्चासत्रासाठी देशभरातून विविध राज्यांच्या विविध विद्यापीठातील प्राध्यापक, अभ्यासक व संशोधक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या चर्चासत्राच्या आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत भोसले यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. संयोजिका हिंदी विभाग प्रमुख प्रा . निर्मला जाधव यांनी चर्चासत्राच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले तसेच उप प्राचार्या डॉ. संगीता आवचार, प्रा . अरुण पडघन, प्रा. संतोष किर्तनकार, डॉ.ओमप्रभा लोहकरे, डॉ. पल्लवी कुलकर्णी, डॉ. रविंद्र इंगळे,हिंदी विभागाच्या डॉ. संगीता लोमटे, डॉ.नसीम बेगम, डॉ . आशा गिरी, डॉ. अभिजित सरनाईक ,प्रा. महेश जाधव, प्रा. यादव, गव्हाणे, कांबळे,प्रा. अहिल्या, आदिंनी सहकार्य दिले व प्रा. मोहम्मद खालेद व प्रा. डॉ. दिनेश धनेश्वर यांने तांत्रिक सहाय्य केले . तसेच इतर सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक कार्यालयीन कर्मचारी व चतुर्थ श्रेणी कर्मचारी आदींनी आपले योगदान दिले....
0 टिप्पण्या