🌟पुर्णा शहरात आज श्री महर्षी वाल्मीकी जयंती निमित्त नेत्र तपासणीसह व भव्य रक्तदान शिबिर कार्यक्रम संपन्न....!


🌟शिबिराला नागरिकांचा मोठा प्रतिसाद : पुर्णा शहरात उद्या २९ ऑक्टोबर रोजी महर्षी वाल्मीकी जयंती मिरवणूकीचे आयोजन🌟 


पुर्णा (दि.२८ ऑक्टोबर) :- पुर्णा शहरात श्री महर्षी वाल्मिक ऋषी जयंती निमित्त विविध सामाजिक सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून काल दि.२७ ऑक्टोंबर रोजी श्री महर्षी वाल्मिक ऋषी जयंतीच्या अनुषंगाने भव्य नेत्र तपासणी शिबिरासह गरजवंतांना अल्पदरात चष्मे वाटपाचे श्री साई दृष्टी नेत्रालय नांदेड यांच्या वतीने करण्यात आले होते या भव्य नेत्र तपासणी शिबिरा मध्ये तब्बल ७४४ नेत्र रुग्णांची तपासणी करण्यात आली.तर आज शनिवार दि.२८ ऑक्टोंबर रोजी श्री महर्षी वाल्मिक ऋषी जयंती निमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबिरात असंख्य रक्तदात्यांनी रक्तदान केले या रक्तदान शिबिरात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रक्तदात्यांचा सत्कार समारंभ पार पडला उद्या रविवार दि.२९ ऑक्टोंबर २०२३ रोजी श्री.महर्षी वाल्मिक ऋषी जयंती मोठया थाटामाटात साजरी करण्यात येणार असून या जयंती महोत्सव मिरवणुकीसाठी गंगाखेड विधानसभा मतदार संघाचे लोकहितवादी आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे,विधान परिषदेचे आमदार रमेश पाटील, शिवसेना (उबाठा) गटाचे उपनेते शरद कोळी,खासदार संजय उर्फ बंडू जाधव,अविनाश कोळी भाजपा नेते नागनाथ घिसेवाड,भोकर कोळी महादेव समितीचे अध्यक्ष ॲड.परमेश्वर गोनारे,बसपा महाराष्ट्र राज्य सचिव नांदेड डीएम कोळी,पुणे अध्यक्ष दशरथ भांडे माजी मंत्री महाराष्ट्र यांची उपस्थिती लाभणार आहे. त्या सोबतच या कार्यक्रमासाठी शासकीय उप विभागीय अधिकारी जीवराज डापकर, तहसीलदार माधवराव बोधीकर,पोलीस निरीक्षक प्रदीप काकडे,मुख्याधिकारी युवराज पौळ,गटविकास अधिकारी मयूर कुमार आंदेलवाड यांची देखील उपस्थिती लाभनार आहे त्यासोबतच स्थानिकांमध्ये शिवसेना (उबाठा) गटाचे सहसंपर्क प्रमुख सुधाकर कराटे,विशाल कदम, शिवसेना नगरसेवक तथा विधीज्ञ ॲड.राजेश भालेराव,माजी नगरसेवक संतोष एकलारे,शहर प्रमुख मुंजा कदम,माँ.शहर प्रमुख बंटी कदम,साहेबराव कदम, श्याम कदम, पार्वतीबाई गावडे,गणपत घोरपडे सुनील जाधव, विकी कदम,प्रताप कदम प्रशांत कापसे,गणेश कदम लक्ष्मीकांत कदम राजू नारायणकर आदींची देखील उपस्थिती लाभणार आहे.


या निमित्ताने दिनांक २९ ऑक्टोबर रोजी शहरातील मुख्य रस्त्याने महर्षी वाल्मिकी यांची भव्य मिरवणूक काढण्यात येणार असून त्यानंतर भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या मिरवणूक सोहळ्यामध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन आयोजक श्री महर्षी वाल्मिक ऋषीं सार्वत्रिक जयंती महोत्सव समिती कोळीवाडा पूर्णा यांच्या वतीने करण्यात आल आहे..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या