🌟शैक्षणिक फिस भरण्यास असमर्थ ठरल्याने मराठा विद्यार्थ्यांची विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या....!


🌟हिंगोली जिल्ह्यातील औढा तालुक्यातल्या दौडगाव येथील हृदयविदारक घटना🌟 

संभाजी नगर येथे महाविद्यालयात शिक्षण घेत असताना घरची अत्यंत हलाकीची परिस्थिती असल्याने महाविद्यालय प्रशासनाने सतत शैक्षणिक शुल्क भरण्यासाठी तगादा लावल्यामुळे सतरा वर्षीय विद्यार्थ्याने विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याची घटना आज शनिवार २१ आक्टोबर २०२३ रोजी सकाळी १०-०० वाजेच्या सुमारास औंढा तालुक्यातील दौंडगाव येथे घडली संबंधित विद्यार्थ्यास उपचारासाठी जिंतूर ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले यावेळी डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले            ‌‌

घरात अठरा विश्व दारिद्रय त्यात वडीलास जेमतेम एक एकर जमीन व घरात पाच मुली दोन मूल असा परिवार आहे पालनपोषणा बरोबर मुलांच्या शिक्षणाची चिंता असूनही शिक्षणासाठी मुलाला संभाजीनगर येथे अकरावी मध्ये वाणिज्य शाखेत शिक्षण  परमेश्वर विठ्ठल चित्रे (वय 17) या विद्यार्थ्याने स्वतःच्या शेतामध्ये विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडली विद्यार्थी हा मागील वर्षभरापासून संभाजीनगर येथे एका खाजगी शिक्षण संस्थेत शिक्षण घेत होता यासाठी वडिलांकडे त्याने महाविद्यालयाची शैक्षणिक शुल्क भरण्यासाठी पैशाची मागणी केली त्यावेळी वडिलांची हालाखिची परिस्थिती असल्याने सोयाबीनची काढणी झाल्यानंतर फिस भरू असे वडिलांनी आश्वासन दिले परंतु शिक्षणाचे होणारे नुकसान भरून निघणार नसल्याने तो नेहमी विवंचनेत राहत असे येत्या काही दिवसात परीक्षा असल्यामुळे महाविद्यालयाचा फिस साठी तगादा असल्याने संबंधित विद्यार्थ्यांने टोकाचे पाऊल उचलले तर आपल्याला आरक्षण असले असते  तर आपल्याला एवढे पैसे भरण्याची आवश्यकता पडली नसती असेही  त्याने वडिलांना अनेकदा सांगितले होते दरम्यान शहरातील ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते त्यावेळी डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले यावेळी मुलाच्या आईचा आक्रोश पाहून ग्रामीण रूग्णालयात भावनिक वातावरण निर्माण झाले होते याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली असून घटनेची नोंद करण्याची प्रक्रिया चालु होती.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या