🌟कारवाई न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा संभाजी सेना तालुकाध्यक्ष गोविंद मोरेंचा इशारा🌟
पुर्णा : पुर्णा तालुक्यातील कान्हेगाव येथील बोगस मिनी दाल मिल प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी पुर्णा तालुका संभाजी सेनेच्या वतीने पुर्णा तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे एका निवेदनात करण्यात आली आहे पूर्णा तालुक्यातील कान्हेगाव येथील लाभार्थी निवृत्ती भुजंग नवघरे यांनी आर के व्ही वाय कृषी यांत्रिकीकरण योजना सन २१-२२ मधील मिनी डाळ मिल चा लाभ घेतला आहे परंतु सदर लाभार्थ्यांनी मिनी दाल मिल शासनाच्या खोटी माहिती देऊन शासकीय जागेत उभारली आहे लाभार्थ्याने दाळ मिल स्वतःच्या जमिनीवर गट क्रमांक 65 मध्ये कागदपत्रे दाखवले व ती शासकीय गायरान जमीन गट क्रमांक एक व अनधिकृत अतिक्रमण करून उभारली आहे तसेच त्याकरिता लागणारी वीज कनेक्शन वडिलांच्या नावे नदीवरून कृषी पंपाचे कागदोपत्री दाखवली आहे परंतु वास्तवता स्मशानभूमीवरून अनाधिकृत वीज घेण्यात येत आहे त्यामुळे लाभार्थ्यांनी कागदपत्रे दाखवलेल्या वीज जोडणीवर मिनी डाळ मिल तर्फे मागील दोन वर्षात किती वीज बिल भरले आहे याबाबत खुलासा करावा संबंधित लाभार्थ्यांनी शासनाची फसवणूक करून एकूण दीड लाख रुपयाचा लाभ शासनाकडून खोट्या माहिती आधारे संबंधित अधिकाऱ्यांच्या संगनमताने लाटला आहे त्यामुळे या कामाची चौकशी करून यामध्ये संबंधित अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करून लाभार्थ्यावर शासकीय फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल असे संभाजी सेनेचे तालुकाध्यक्ष गोविंद मोरे यांनी निवेदनात नमूद केली आहे.....
0 टिप्पण्या