🌟परभणी जिल्ह्याधिकारी कार्यालयात मराठा आरक्षणासाठी युवकाने अंगावर पेट्रोल टाकून केला आत्मदहनाचा प्रयत्न....!


🌟पोलीस प्रशासनाचे अधिकारी व उपस्थितांनी प्रसंगावधान राखून काडेपेटी हिसकल्यामुळे अनर्थ टळला🌟

परभणी (दि.२७ ऑक्टोंबर) - परभणी जिल्ह्यात देखील आता मराठा आरक्षणा संदर्भात सरकार वेळकाढू धोरणाचा अवलंब करीत असल्यामुळे मराठा समाज बांधवांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत असून क्रांतिकारी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा सुरू केलेल्या आमरण उपोषणाकडे सरकार दुर्लक्ष करुन मराठा समाजाला आरक्षण देण्यास टाळाटाळ करीत खेळवत ठेवत असल्याने व मराठ्यांना आरक्षणापासून ठेवण्याची मासिकता दाखवत असल्याने संतप्त मराठा युवक अतिश गरड  यांनी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला त्यांनी स्वतःच्या अंगावर पेट्रोल टाकून घेतले त्यावेळी पोलीस प्रशासनाचे अधिकारी मोहसीन खान,शिवा काळे यांनी प्रसंगावधान राखत तात्काळ त्यांच्या अंगावर झडप घेऊन काडीची डब्बी हिसकाऊन घेतली व त्यांना ताब्यात घेतले अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष मा. नरेंद्र पाटील यांनी फोन करून अतिश गरड यांची विचापूस करून त्यांना असे टोकाचे पाऊल उचलू नका असे समजावून सागितले यावेळी मराठा आरक्षणाचे गजानन जोगदंड, विठ्ठल तळेकर,अरुण भाऊ पवार,अमोल अवकाले, स्वप्निल गरुड, सिद्धू कदम, जाफर तरोडेकर यांनी त्यांना तिथून घेऊन  पोलीस स्टेशन येथे घेऊन आले व पोलीस प्रशानाने अतिश गरड समजावून सागितले की हा मार्ग चुकीचा आहे.....  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या