🌟सकल मराठा समाज बांधवांचा निर्धार : मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत 'नेत्यांना गावात प्रवेश बंद मतदानावर बहिष्कार'🌟
पुर्णा (दि.२८ ऑक्टोंबर) - पुर्णा तालुक्यातील भाटेगावात मराठा क्रांतिकारी योध्दा मनोज जरांगे पाटील यांना पाठींबा म्हणून भाटेगावातील सकल मराठा समाज व गावकऱ्यांनी भाटेगाव ग्रामपंचायत कार्यालयासमोर आज शनिवार दि.२८ ऑक्टोंबर रोजी साखळी उपोषणास सुरूवात करण्यात आली असून जोपर्यंत मराठा क्रांतिकारी योध्दा मनोज जरांगे पाटलांचा आदेश येत नाही तोपर्यंत साखळी उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार सकल मराठा समाज बांधवांनी व्यक्त केला आहे.
यावेळी भाटेगावातील सकल मराठा समाज यांच्या वतीने गावात कोणत्याही राजकीय नेत्यांना गावात प्रवेश दिला जाणार नाही व जो पर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा देण्यात आला आहे यावेळी साखळी उपोषण सुरू करण्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज व जिजाऊ आऊसाहेब यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे.....
0 टिप्पण्या