🌟प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेतील पुरस्काराचे वितरण🌟
परभणी (दि.०५ ऑक्टोंबर) : केंद्र शासनपुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना आणि राज्य शासनपुरस्कृत घरकुल योजना २०२२-२३ ची प्रभावी अंमलबजावणी करून उत्कृष्ट काम केल्याबद्दल मानवत पंचायत समितीला सर्वोकृष्ट पुरस्कार जिल्हा समन्वय आणि संनियंत्रण समितीचे अध्यक्ष तथा खासदार संजय जाधव यांच्या हस्ते जिल्हा नियोजन सभागृहात आयोजित कार्यक्रमात प्रदान करण्यात आला जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मून, महापालिका आयुक्त श्रीमती तृप्ती सांडभोर, जिल्हा विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक श्रीमती रश्मी खांडेकर, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती अनुराधा ढालकरी, उपजिल्हाधिकारी (रोहयो) जीवराज डापकर व्यासपीठावर उपस्थित होते.
केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना व राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजनांची प्रभावी अंमलबजावणीच्या उद्देशाने 2022 -23 या कालवधीत राज्यात अमृत महाआवास अभियान राबविण्यात आले होते. या अभियानात सर्वोत्कृष्ट काम करणा-या संस्था व व्यक्तींना पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. जिल्हास्तरीय अंमलबजावणी, सनियंत्रण व मूल्यमापन समितीने अभियान कालावधीत विविध उपक्रमांमध्ये सर्वोत्कृष्ट काम करणा-या व्यक्ती व संस्थांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) मधून अमृत महाआवास अभियान 2022-23 या वर्षात अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करून सर्वोकृष्ट काम केल्याबद्दल मानवत पंचायत समितीला प्रथम पुरस्कार प्रदान करण्यात आला तर सेलू द्वितीय आणि पालम पंचायत समितीला तृतीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाला.
तालुका स्तरावर अमृत महाआवास अभियान 2022-23 यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण या केंद्र पुरस्कृत योजनेत सर्वोकृष्ट क्लस्टर पुरस्कारामध्ये सोनपेठ तालुक्यातील नरवाडी ग्रामपंचायतीला प्रथम, पुर्णा तालुक्यातील कावलगाव द्वितीय आणि जिंतूर तालुक्यातील वस्सा ग्रामपंचायतीला तृतीय क्रमांकाचा पुरस्कार ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांना प्रदान करण्यात आला. यामध्ये अनुक्रमे रवि आडे, एन. जी. शेवाळे आणि श्रीमती स्वाती रोडे या अभियंत्यांनी स्विकारला. तर राज्य पुरस्कृत योजनेमध्ये जिंतूर तालुक्यातील आडगाव (बा) प्रथम, पालम तालुक्यातील पेठशिवणी द्वितीय तर सोनपेठ तालुक्यातील नरवाडीला तृतीय पुरस्कार मिळाला. हे पुरस्कार अनुक्रमे प्रतिक जगताप, ऋषिकेश वाघमारे आणि आनंद गंगावणे यांनी स्विकारले.
प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) केंद्र पुरस्कृत योजनेमधून अमृत महाआवास अभियान 2022-23 या वर्षात मानवत तालुक्यातील बोंदरवाडी प्रथम, गंगाखेड तालुक्यातील मरगळवाडी द्वितीय आणि मानवत तालुक्यातील वझुर (खु) ला तृतीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाला. तसेच राज्य पुरस्कृत योजनेमध्ये जिंतूर तालुक्यातील चारठाणा, गंगाखेड तालुक्यातील मरगळवाडी आणि पुर्णा तालुक्यातील ममदापूरचे सरपंच आणि ग्रामसेवकांनी पुरस्कार स्विकारला. यावेळी जिल्ह्यातील गटविकास अधिकारी, अभियंता, ग्रामसेवक आणि संबंधित ग्रामपंचायतीचे सरपंच उपसि्थत होते......
*****
0 टिप्पण्या