🌟पुर्णेत धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमांनी उत्साहात संपन्न ....!

 

🌟धम्मचक्र गतिमान करण्यासाठी प्रत्येक बौद्ध अनुयायांनी कटिबद्ध असले पाहिजे - प्रकाश कांबळे 


पुर्णा (दि.२४ ऑक्टोबर) - पुर्णा शहरात आज मंगळवार दि.२४ ऑक्टोबर २०२३ रोजी अखिल भारतीय भिक्कु संघाचे कार्याध्यक्ष पूज्य भदंत डॉ.उपगुप्त महाथेरो,पूज्य भदंत पयावांश यांच्या प्रमुख मार्गदर्शन खाली धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनाचे आयोजन करण्यात आले होते.


शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात सकाळी १०-०० वाजता पूज्य भंते पय्यावांश व श्रामनेर संघाच्या उपस्थितीत पुर्णा नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष प्राचार्य मोहनराव मोरे आंबेडकरी विचारवंत तथा जेष्ठ रिपाइं नेते प्रकाश कांबळे,पुर्णा पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक प्रदीपजी काकडे,माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक उत्तंमभय्या खंदारे ज्येष्ठ नगर सेवक अनिल खर्गखराटे,मा.नगरसवक ॲड.धम्मा जोंधळे,मा.नगरसेवक मधुकर गायकवाड,गौतम भोळे यांच्या उपस्थितीत बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पंचरंगी धम्म ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले.समता सैनिक दलाने मानवंदना दिली.

भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा परभणी तालुका व शहर शाखा पुर्णाच्या वतीने डॉ.आंबेडकर नगर या ठिकाणी डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक हॉल येथे पंचरंगी धम्म ध्वजाचे ध्वजारोहण सकाळी १०-०० वाजता बुद्ध विहार पूर्णा या ठिकाणी भदंत पाय्यावंश यांच्या हस्ते पंचरंगी धम्म ध्वजाचे ध्वजारोहण केले तर दुपारी १२-०० वाजता सामूहिक बुद्ध वंदने नंतर बुद्ध विहार येथून महामानव तथागत भगवान बुद्ध व बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांची शहरातील मार्गावरून भव्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीचा समारोप जाहीर धम्मसभे मध्ये झाला.

 प्राचार्य मोहनराव मोरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमच प्रास्ताविक नगरसेवक हर्षवर्धन गायकवाड यांनी केले.आपल्या प्रास्ताविकात त्यांनी पुर्णा शहराच्या धम्म चळवळीचा रोम हर्षक इतिहास विशद केला. माजी उपनगराध्यक्ष उत्तम भैय्या खंदारे यांनी प्रत्येकाने धम्माचे आचरण केले पाहिजे असे म्हटले तर आंबेडकरी विचारवंत तथा जेष्ठ रिपाइं नेते प्रकाश कांबळे यांनी यावेळी असे नमूद केले की धम्मचक्र गतिमान करण्यासाठी प्रत्येक बौद्ध अनुयायांनी कटिबद्ध असले पाहिजे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेली धम्म क्रांती निर्माण होईल आपले आचरण सदैव धम्माशी सुसंगत असल पाहिजे असेही ते म्हणाले.  

* बुद्ध धम्माचे मानवतावादी विचार जगाला दिशादर्शक - पो.नि.प्रदिप काकडे 


 धम्मचक्र अनुप्रवर्तन दिना निमित्त डॉ.आंबेडकर चौकात आयोजित जाहीर सभेला संबोधित करताना पुर्णा पोलिस स्थानकाचे कर्तव्यदक्ष पोलिस निरीक्षक व महापुरुष समाज सुधारक यांच्या विचारांचे अभ्यासक प्रदीप काकडे म्हणाले की भारतरत्न बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे समता बंधुता स्वतंत्र व न्यायाचे पुरस्कर्ते होते.त्यामुळे त्यांनी आपल्या पाच लाख अनुयायांना बुद्ध धम्माची दिक्षा दिली बुध्द धम्माची महान विचार प्रणाली संपूर्ण जगाला दिशा दर्शक आहे असेही यावेळी ते म्हणाले.

प्रमुख धम्म देशने मध्ये भदंत पयावांश यांनी धम्म चक्र अनुप्रवर्तन दिनाचं महत्व विशद केले अध्यक्षीय समारोपात प्राचार्य मोहनराव मोरे यांनी महामानव तथागत भगवान बुद्ध व बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे मानवतावादी विचार जगाला दिशादर्शक आहेत.त्या विचारावर चालण्याचा आपण संकल्प करूया असे आव्हान त्यांनी केले सभे नंतर महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध प्रबोधनकार झी युवा फेम रविराज भद्रे यांचा भिमबुद्ध गित गायनाचा बहारदार कार्यक्रम संपन्न झाला.

वरील कार्यक्रमास भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा ध्यक्ष शामराव जोगदंड सचिव तुकाराम ढगे विहार समितीचे अमृतराव मोरे टी.झेड.कांबळे वा.रा. काळे.दिलीप गायकवाड कॉ.अशोक कांबळे मुगाजी खंदारे ज्ञानोबा जोंधळे मुंजाजी गायकवाड पत्रकार विजय बगाटे मोहन लोखंडे गौतम काळे  मिलिंद कांबळे विजय जोंधले गौतम वाघमारे त्रांबक कांबळे अतुल गवळी किशोर ढकरगे उमेश बाऱ्हाटे आमृत कऱ्हाले आदी उपस्थित होते .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दादाराव पंडित यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पी.जी रणवीर श्रीकांत हिवाळे शा हिर विजय सातोरे गौतम कांबळे सूरज जोंधळे राम भालेराव विहार समिती भारतीय बौद्ध महासभा धम्म चक्र अनुप्रवर्तन सोहळा समिती ब धम्म सेवेत कार्यरत असलेल्या महिला मंडळांनी केले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या