🌟महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालले महत्त्वपूर्ण निर्णय......!


🌟राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना. मुलींना करणार लखपती. ( महिला आणि बालविकास)🌟

गेल्या आठवड्यातच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत अजित पवार न आल्याने राज्यात खळबळ उडाली होती. यानंतर आज पुन्हा मंत्रिमंडळ बैठक घेण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत आज सात महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.

*हे आहेत सात निर्णय : 👇

◾️ *राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना. मुलींना करणार लखपती. ( महिला आणि बालविकास)*

◾️ *सार्वजनिक खासगी भागीदारीतून उदंचन जलविद्युत प्रकल्पासाठी धोरण. मोठ्या प्रमाणावर खासगी गुंतवणूक जलविद्युतमध्ये येणार.  ( जलसंपदा विभाग)*

◾️ *सांगली, अहमदनगर जिल्ह्यात  जिल्हा आणि अतिरिक्त सत्र* *न्यायालये (विधि व न्याय विभाग)*

◾️ *पात्र माजी खंडकरी शेतकऱ्यांना 1 एकरापेक्षा कमी जमीन मिळणार. (महसूल विभाग)*

◾️ *फलटण ते पंढरपूर नवीन ब्रॉडगेज रेल्वेमार्ग आता रेल्वे मंत्रालयातर्फे पूर्ण करणार ( परिवहन विभाग)*

◾️ *भोसला मिलिटरी स्कूलला नागपूर येथे जमीन ( महसूल व वन विभाग)*

◾️ *विद्यापीठाच्या नावात औरंगाबाद ऐवजी छत्रपती संभाजीनगर बदल करण्यास मान्यता ( उच्च व तंत्र शिक्षण)

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या