🌟ताडकळस येथे सर्व समाज बांधवांनी सर्वानुमते निर्णय घेऊन सर्व राजकीय नेत्यांची ताडकळस गावात गाव बंदी केली🌟
पुर्णा (दि.२५ ऑक्टोंबर): पुर्णा तालुक्यातील ताडकळस येथे सर्व समाज बांधवांनी सर्वानुमते निर्णय घेऊन सर्व राजकीय नेत्यांची ताडकळस गावात गाव बंदी केली आहे मराठा आरक्षण मिळेपर्यंत कोणीही ताडकळस मध्ये राजकीय नेत्यांनी प्रवेश करू नये व कार्यक्रम घेऊ नये व तसेच आज दिनांक 25 ऑक्टोबर रोजी पासून जरांगे पाटील यांना समर्थन दर्शवीत साखळी उपोषण करण्याच्या निर्णय घेतला आहे.
सर्व मराठा बांधवांनी भव्य रॅली काढून साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे व तसेच विविध संघटनेने विविध मुस्लिम बांधवांनी जाहीर पाठिंबा दर्शविला आहे यावेळी ताडकळस परिसरातील आजी-माजी लोकप्रतिनिधी सर्व पक्षातील समाज बांधव विविध संघटना मराठा समाज बांधव व बहुजन समाज बांधव व विशेष मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते....
0 टिप्पण्या