🌟आमरण उपोषणास बसणार असल्या संदर्भात गौर येथील मराठा समाज बांधवांनी चुडावा पोलिस प्रशासनाला निवेदन दिले आहे🌟
पुर्णा (दि.२८ ऑक्टोंबर) - पुर्णा तालुक्यातील मौजे गौर येथे उद्या रविवार दि.२९ ऑक्टोंबर २०२३ रोजी सकाळी ०९-०० वाजेपासून क्रांतिकारी मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ व महाराष्ट्रातील मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे या मागणीसाठी आमरण उपोषण व त्या उपोषणाला पाठिंबा म्हणून गावातच साखळी उपोषण पण करण्यात येणार आहे राज्य शासन व केंद्र शासन मराठ्यांना सतत झुलवत ठेवत आहे मराठा समाजाच्या आरक्षणाचे भरपूर पुरावे सापडलेले असताना देखील मराठा समाजाला आरक्षण हे शासन का देत नाही या मुद्द्यावर मराठा समाजा मध्ये शासना विषयी प्रचंड असंतोष निर्माण झालेला आहे या सर्व बाबीची जाणीव ठेवून गौर येथील समाज बांधवांनी पोलीस स्टेशन चुडावा यांना निवेदन देऊन आरक्षण मिळेपर्यंत आमरण उपोषणास बसणार असल्याचे निवेदनाद्वारे कळविले आहे....
0 टिप्पण्या