🌟शिष्यवृत्ती अर्ज भरण्याकरिता https://mahadbtmahiti.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन प्रक्रिया🌟
परभणी (दि.18 ऑक्टोंबर) : प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कळमनुरी ता. कळमनुरी जि. हिंगोली या प्रकल्पाच्या कार्यक्षेत्रातर्गंत परभणी व हिंगोली या जिल्ह्यांचा समावेश होतो. सन 2023-2024 या शैक्षणिक वर्षातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात प्रवेशित व पात्र असलेल्या विद्यार्थ्यांना महाडिबीटी पोर्टलवरुन त्यांच्या आधार सलंग्न बँक खात्यात शिष्यवृत्ती जमा करावयाची असल्याने विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अर्ज भरण्याकरिता https://mahadbtmahiti.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन प्रक्रिया दि. 11 ऑक्टोबर,2023 पासून सुरु करण्यात आली आहे. तरी विद्यार्थ्यांनी सर्व मुळ कागदपत्रे स्कॅन करुन महाडिबीटी पोर्टलवर अपलोड करावीत तसेच ऑनलाईन अर्ज भरुन अर्जाची प्रत व अपलोड केलेले कागदपत्र संबंधीत महाविद्यालयाकडे जमा करावेत तसेच संबंधीत महाविद्यालयाने सर्व कागदपत्राची तपासणी करुन पात्र अर्ज मंजूरीसाठी प्रकल्प कार्यालयाला ऑनलाईन पाठवावेत असे आवाहन प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कळमनुरी यांनी केले आहे.....
0 टिप्पण्या