🌟नांदेड येथील वामनदादा कर्डक नगर तरोडा बु.येथील नालंदा बुद्ध विहारात ६७ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा....!


🌟नालंदा बुध्द विहार कमिटीचे अध्यक्ष मोहनराव गर्दनमारे यांची प्रामुख्याने उपस्थिती🌟


नांदेड : नांदेड येथील वामनदादा कर्डक नगर तरोडा बु येथे आज मंगळवार दि. २४ ऑक्टोंबर २०२३ रोजी सकाळी १०-३० वाजता नालंदा बुध्द विहारात ६७ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन नालंदा बुध्द विहार कमिटीचे अध्यक्ष मोहनराव गर्दनमारे यांचे अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात नालंदा बुद्ध विहार येथे साजरा करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला मा. आमदार बालाजी कल्याणकर व सामाजिक कार्यकर्ते धम्मा कदम उपस्थित राहणार होते परंतु त्यांना अचानक मुंबईला जायचे असल्यामुळे उपस्थित राहू शकले नाहीत.


 परंतु त्यांनी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत सुरवातीला आपले आदर्श भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर व तथागत म. गौतम बुद्ध या महामानवांच्या प्रतिमांचे पूजन व पंचशील ध्वजारोहण अध्यक्ष मोहनराव गर्दनमारे व जेष्ठ उपासक यांच्या हस्ते करण्यात आले आहे.त्याप्रसंगी बुध्द विहार कार्यकारी मंडळाचे सदस्य व जेष्ठ उपासक हजर होते. 

बुध्द वंदना व धम्म गाथा  महिला मंडळाच्या अध्यक्षा उपासिका भालेराव मॅडम, घुले मॅडम व सोनकांबळे मॅडम यांनी अतिशय उत्कृष्टपणे सर्वांना ग्रहण केली आहे कार्यक्रमाची  प्रस्तावना व सूत्रसंचालन आयु. एस. एस. सुर्वे सर यांनी अतिशय उत्कृष्ट पणे केले आहे तसेच धम्मचक्र प्रवर्तनदिना निमित्त उपासिका कांचन पवार मॅडम , घुले मॅडम व एस. एस.सुर्वे सर यांनी विस्तृत असे धम्मावर विचार मांडून सर्वांना मार्गदर्शन केले आहे. 

       शेवटी सचिव आयु. एम.जी.पवार यांनी कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन करुन कार्यक्रमाचा  समारोप करण्यात आला आहे धम्मचक्र प्रवर्तदिनानिमित्त साजरा करण्यात आला त्याप्रसंगीची काही क्षणचित्रे खालील प्रमाणे आहेत.....

💐🎉🙏🙏🎉💐💐

 सर्वांचे कल्याण हो. मंगल हो.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या