🌟या मोहिमे अंतर्गत घरी जाऊन आधार कार्ड काढून देण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रशासनास सूचना🌟
🌟जिल्ह्यात आधारकार्ड नसल्याने शासकीय योजनांपासून वंचीत राहणाऱ्या दिव्यांगाची संख्या पाच ते सहा हजार🌟
परभणी (दि.२८ ऑक्टोंबर) - परभणी जिल्ह्यामध्ये आधारकार्ड नसल्याने विविध शासकीय योजनांपासून वंचीत राहणाऱ्या दिव्यांगाची संख्या साधारण ५ ते ६ हजार आहे. दिव्यांग कल्याण मंत्रालयाच्या वतीने मागील चार महिण्यापूर्वी जिल्ह्यामध्ये शंभर दिवसाची विशेष दिव्यांग तपासणी व शोध मोहिम घेण्यात आली होती या मोहिमे मध्ये शासकीय यंत्रणेने दाखविलेल्या निष्काळजीपणा मुळे १००% दिव्यांगाचा शोध घेऊन त्यांचे आधार कार्ड व युडीआयडी कार्ड बनविण्यास जिल्हा प्रशासन पुर्णत: अपयशी ठरले आहे याच मुळे शहरी आणि ग्रामीण भागात आधार कार्ड नसल्याने विविध शासकीय योजनांपासून वंचित राहणाऱ्या दिव्यांगाची संख्या मोठी आहे.
परभणी जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागामध्ये हात नसणारे, हाताची बोटे छोटी असणारे, हाताची बोटे वाकडी असणारे, मतीमंद व इतर कारणाने हाताचे ठस्से न उमटणाऱ्या दिव्यांगाना आधार कार्ड पासून वंचीत राहावे लागत आहे बोटांचे ठसे उमटत नसतील तर डोळ्यांच्या बुभुळांच्या आधारे आधार कार्ड काढता येतात परंतु प्रशासन त्यांच्या पर्यंत न पोहचल्याने अनेक दिव्यांगांचे आधार कार्ड नाहीत अश्या सर्व दिव्यांग बंधु आणि भगिनी साठी जिल्ह्याभरात एक विशेष शोध मोहिम घेवून अश्या वंचित दिव्यांगाच्या प्रत्येक्ष घरी जावून त्यांचे आधारकार्ड काढण्यात यावे. अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे दि.१६ ऑक्टोंबर १०२३ रोजी करण्यात आली होती.
या मागणीतील गंभीरता ओळखून जिल्हाधिकारी परभणी यांनी दि.१८ ऑक्टोंबर १०२३ रोजी आयुक्त, महानगर पालिका, परभणी, जिल्ह्यातील सर्व तहसीलदार, सर्व गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी नगर परिषद यांना पत्र पाठवून जिल्ह्यातील सर्व शहरी व ग्रामीण भागातील ज्या दिव्यांगाना आधार कार्ड नाहीत अश्या दिव्यागांसाठी विशेष शोध मोहीम घेऊन त्यांच्या घरी जाऊन आधार कार्ड काढावेत व या संदर्भातील अहवाल दर सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयास कळवावा व आधार कार्ड पासून व शासकीय योजनांपासून एक ही दिव्यांग वंचित राहणार नाही याची काळजी घ्यावी अशी सूचना या पत्रात करण्यात आली आहे.
प्रहार जनशक्ती पक्सच्या मागणी मुळे जिल्हाधिकारी परभणी यांनी काढलेल्या या पत्रामुळे मागील अनेक वर्षापासून फक्त आधार कार्ड नसल्याने विविध शासकीय योजनांपासून वंचित असलेल्या जिल्ह्यातील ५ ते ७ हजार दिव्यांगांना याचा फायदा होणार आहे. प्रहार जनशक्ती पक्षाच्या मागणीचे हे यश आहे प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने,तालुका प्रमुख उद्धव गरुड, शहर प्रमुख अंकुश गिरी, शहर चिटणीस वैभव संघई, शेख बशीर आदींच्या स्वाक्षऱ्या या मागणी निवेदनावर होत्या....
0 टिप्पण्या