🌟गंगाखेडला ‘साई सेवा’ च्या दसरा महोत्सवाचा शुभारंभ.....!


🌟सोहळा आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हाधिकारी  रघुनाथ गावडे यांच्या प्रमुख ऊपस्थितीत संपन्न होणार🌟 

गंगाखेड : येथील साई सेवा प्रतिष्ठाणचा अपप्रवृत्ती पुतळा दहन सोहळा या वर्षीही ऊत्साहात साजरा होणार आहे. आज ५१ फुटी पुतळा बनवण्याच्या कामाचे भूमीपूजन करण्यात आले. यावर्षीचा सोहळा गंगाखेडचे आ. डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या अध्यक्षतेखाली आणि जिल्हाधिकारी श्री रघुनाथ गावडे यांच्या प्रमुख ऊपस्थितीत संपन्न होणार असल्याची माहिती प्रतिष्ठाणचे अध्यक्ष गोविंद यादव यांनी यावेळी दिली. 

गंगाखेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बाळकाका चौधरी यांच्या हस्ते आणि आ. डॉ. रत्नाकर गुट्टे काका मित्र मंडळाचे जिल्हाध्यक्ष तथा जि. प. सदस्य प्रल्हाद झोलकर, रासपा जिल्हाध्यक्ष ॲड. संदिप अळनुरे यांच्या प्रमुख ऊपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. हिंगोली येथील विठ्ठल भुसांडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या परिश्रमातून अपप्रवृत्तींचा ५१ फुटी पुतळा बनवला जाणार आहे. नेत्रदीपक आतीषबाजी आणि सांस्कृतीक कार्यक्रम हे कार्यक्रमाचे खास वैशिष्ट्य बनलेले आहे. रथ परिक्रमेनंतर गोदातटावर रंगणाऱ्या कार्यक्रमास पंचक्रोशीतील हजारो भाविकांची ऊपस्थिती असते. 

स्मशानभूमी परिसरात संपन्न झालेल्या कार्यक्रमास साई सेवा प्रतिष्ठाणचे अध्यक्ष गोविंद यादव, सचिव नागेश पैठणकर, गजानन महाजन, रमेश औसेकर, बाळासाहेब राखे, नंदकुमार भरड, हाजी गफार शेख, गुंडेराव देशपांडे, बालासाहेब यादव, संदीप कोटलवार, कारभारी निरस, गजानन जोशी, बाळासाहेब सोनटक्के, सुहास देशमाने, व्यंकटेश यादव, भारत गोरे, प्रथम यादव, येलाप्पा शंकुवाड आदिंसह प्रतिष्ठाणच्या सदस्यांची ऊपस्थिती होती.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या