🌟परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या उपस्थितीत कार्यालय परिसराची स्वच्छता.....!


🌟आज रविवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात स्वच्छता मोहिमेत परिसर स्वच्छता करण्यात आला🌟


परभणी (दि.०१ सप्टेंबर २०२३) : राज्यात सर्वत्र स्वच्छता पंधरवडा मोहीम राबविण्यात येत असून, जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या उपस्थितीत आज रविवारी, सकाळी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात स्वच्छता मोहिमेत परिसर स्वच्छता करण्यात आला जिल्हाधिकारी परिसरात आज सकाळी 10 वाजेपासून ‘स्वच्छतेसाठी एक तारीख- एक तास’ हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती अनुराधा ढालकरी, तहसीलदार संदीप रायपुरे, सुरेश घोळवे, नायब तहसीलदार प्रशांत वाकोडकर, श्रीमती पटवे आदी उपस्थित होते. 


देशात सर्वत्र स्वच्छतेची चळवळ उभी राहावी, यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली ‘स्वच्छता हीच सेवा’ हे अभियान देशभरात राबविण्यात येत आहे. त्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात राज्यभर स्वच्छता मोहिमेची यशस्वीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे.  या स्वच्छता मोहिमेत महाराष्ट्र नेहमीच अग्रेसर राहिला आहे. स्वच्छता हे अभियान केवळ कागदावर न राहता त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यात येत असून, आज जिल्हाधिकारी कार्यालय परिसर अधिकारी व कर्मचा-यांनी स्वच्छ केला. 

या अभियानाला चळवळीचे स्वरूप आले पाहिजे, यासाठी 'स्वच्छता हीच सेवा' या मोहिमेत सर्व अधिकारी आणि कर्मचा-यांनी श्रमदान केले. या श्रमदानात प्रशासनासह जनसहभाग अत्यंत गरजेचा आहे. त्याअनुषंगानेच राज्यात 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2023 या कालावधीत स्वच्छता पंधरवडा राबविण्यात येत आहे. या पंधरवड्याअंतर्गत जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज रविवार, (दि.1) रोजी ‘एक तारीख- एक तास’ स्वच्छतेसाठी श्रमदान हा उपक्रम राबविण्यात आला. नागरिकांनीही या स्वच्छता मोहिमेमध्ये सहभागी होत आपला परिसर स्वच्छ ठेवून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना स्वच्छतेतून अभिवादन करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी श्री. गावडे यांनी केले आहे.  

यावेळी शहरातील गणपती चौक, शनिवार बाजार, नूतन महाविद्यालय जिंतूर रोड, तुरबुल हक्क दर्गा, स्त्री रुग्णालय, म्युनिसिपल कॉलनी, नेहरू पार्क, माळी वाडा, उड्डाणपूल परिसर, समाज मंदिर सारनाथ कॉलनी, हडको समाज मंदिर, आनंद नगर जैन मंदिराजवळ, गणपती मंदिर, सुपर मार्केट, गणेश नगर, गांधी पार्क, समाज मंदिर  वर्मा नगर आदी ठिकाणी आणि जिल्ह्यात सर्वत्र ही मोहीम राबविण्यात आली.  

प्रशासकीय इमारत परिसरातही स्वच्छता पंधरवडा उपक्रमांतर्गंत परिसर स्वच्छता मोहीम राबवित परिसर स्वच्छता करण्यात आली.....

            *****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या