🌟पुर्णा तालुक्यातील धनगर टाकळी येथील डॉ.अभिजीत चंद्रकांत साखरे यांची पशुधन विकास अधिकारी वर्ग १ पदी निवड...!


🌟सामाजिक शैक्षणिक व राजकीय वैभव शाली भरीव पार्श्वभूमी लाभलेल्या कुटुंबातून ते आले आहेत🌟

🌟त्यांच्या या नेत्रदीपक यशा बद्दल त्यांच्यावर मित्रपरिवार आप्तेष्ट नातेवाईक यांनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे🌟

महाराष्ट्र लोकसेवा आयोगा तर्फे घेण्यात आलेल्या पशुधन अधिकारी वर्ग १  परीक्षे मध्ये डॉ.अभिजीत चंद्रकांत साखरे यांनी नेत्र दीपक यश संपादन करून त्यांना नियुक्तीचे पत्र मिळाले आहे.सामाजिक शैक्षणिक व राजकीय वैभव शाली भरीव पार्श्वभूमी लाभलेल्या कुटुंबातून ते आले आहेत.

डॉ.अभिजीत यांचे आजोबा धनगरटाकळी येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे पाच दशकाहून जास्त चेयरमन राहिलेले      सखा रामजी साखरे यांचे ते नातु आहेत.गोदावरी शिक्षण संस्था संचलित राष्ट्रमाता इंदिरा गांधी स्मारक हायस्कूल धनगर टाकळी चे उपाध्यक्ष म्हणून ते कार्यरत आहेत.समाजातील शोषित पीडित वंचित वंचित गरीब घटकांना मदत करण्या च काम ते करत असतात.त्यांचे ज्येष्ठ सुपुत्र चंद्रकांत साखरे हे जालना या ठिकाणी समृध्दी महामार्ग विभागात पोलिस उपनिरीक्षक पदावर कार्यरत आहे.पोलिस खात्यातील कर्तव्यनिष्ठ समर्पित सेवे बद्दल अनेक बहुमोल पुरस्कारांनी ते सन्मानित आहेत.परभणी पोलिस दला मध्ये त्यांनी आपल्या सेवेची वेगळी छाप निर्माण केली होती.त्यांचे दुसरे चिरंजीव डॉ.गजानन साखरे हे आयुर्वेद तज्ञ असून त्यानी  आपली स्वतःची आयुर्वेद उपचार पद्धती विकसित केली आहे संपूर्ण मराठ वा ड्या मधून उपचारासाठी रुग्ण त्यांच्या कडे येत असतात. पूर्णा या ठिकाणी त्याचं सुसज्ज आयुर्वेद रुग्णालय आहे.

डॉ.अभिजीत हे चंद्रकांत साखरे यांचे चिरंजीव आहे.त्यांनी पशुवैद्यकीय वैद्यकीय शाखे मध्ये एम. व्हीं. एस.सी.ही पदवी प्राप्त केली. कर्नाल हरियाणा येथे पशु प्रजनन आणि प्रसूती शास्त्रात त्यांनी सखोल संशोधन करून मास्टर डिग्री प्राप्त केली आहे त्यांच्या या नेत्रदीपक यशा बद्दल धनगर टाकळी,पुर्णा,परभणी गंगाखेड,जालना येथील मित्रपरिवार आप्तेष्ट नातेवाईक यांनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या