🌟पुर्णा रेल्वे स्थानकावरून अकोला येथे जाण्यासाठी निघालेल्या मालगाडीचे दोन इंजन रुळावरून घसरले सुदैवाने अनर्थ टळला....!🌟या घटनेत सुदैवाने कुठल्याही प्रकारची हाणी झाली नाही त्यामुळे पुढील अनर्थ टळला🌟


पुर्णा (दि.२६ ऑक्टोंबर) - पुर्णा रेल्वे स्थानकावरून अकोला येथे जाण्यासाठी निघालेल्या मालगाडीचे दोन रेल्वे इंजिन रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर असलेल्या मैल क्रमांक ५६ बी १/१२ अंतरावर व्यंकटी प्लांट परिसरात रेल्वे रुळावरून घसरल्याची घटना आज गुरुवार दि.२६ ऑक्टोंबर २०२३ रोजी सायंकाळी ०६-०० ते ०६-३० वाजेच्या सुमारास घडली.


या घटनेत सुदैवाने कुठल्याही प्रकारची हाणी झाली नाही त्यामुळे पुढील अनर्थ टळला रेल्वे प्रशासनाकडून  रेल्वे इंजिन रेल्वे रुळावर आणण्याचे काम  युद्ध पातळीवर  चालू केले आहे  रुळावरून ये जा करणाऱ्या एक्सप्रेस व पॅसेंजर रेल्वे विलंबाने धावत आहेत रेल्वे  इंजिन रुळावरून घसरल्यामुळे व अनेक प्रवासी रेल्वे गाड्या उशिराने धावत असल्याने प्रवाशांमध्ये मोठी तारांबळ उडाल्याचे निदर्शनास येत होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या