🌟हा कार्यक्रम मराठा आरक्षण अंदोलनाच्या पार्श्वभुमीवर पुढे ढकलण्याचा निर्णय आ.बच्चुभाऊ कडु यांनी घेतला आहे.🌟
परभणी - दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्ष तथा मंत्रीपदाचा दर्जा असलेले मा.ना.बच्चुभाऊ कडु यांच्या संकल्पनेतून व नेतृत्वाखाली दि. ०१ नोव्हेंबर २०२३ रोजी परभणी येथे होणारा दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी हा कार्यक्रम मराठा आरक्षण अंदोलनाच्या पार्श्वभुमीवर पुढे ढकलण्याचा निर्णय मा.ना.बच्चुभाऊ कडु यांनी घेतला आहे.
काल मा.ना.बच्चुभाऊ कडु, प्रहार जनशक्ती पक्ष परभणी जिल्हा प्रमुख, मा. जिल्हाधिकारी परभणी व मा. जिल्हा पोलीस अधिक्षक परभणी यांच्या सोबत झालेल्या चर्चे नंतर हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला असे जिल्हा प्रशासनास दिव्यांग कल्याण विभागाच्या वतीने कळविण्यात आले आहे.
दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी हा कार्यक्रम मुळात दिव्यांगासाठी होणार होता या कार्यक्रमाची संपूर्ण तयारी जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आली होती व या साठी जिल्हयाभरातून जिल्हयाच्या कान्याकोप-यातून १५ ते २० हजार दिव्यांग बंधु भगीनी या कार्यक्रमाला येणार होते परभणी जिल्हयात मराठा आरक्षण अंदोलनामुळे गावोगांवी सुरु असलेले उपोषण आंदोलन यामुळे या दिव्यांगाना कार्यक्रमास्थळा पर्यतं येणे शक्य होणार नसल्याने दिव्यांगा शिवाय हा कार्यक्रम होवू शकत नाही. या सर्व बाबींचा विचार करुण व मराठा आरक्षण अंदोलकांच्या भावनांचा आदर करून सदरील कार्यक्रम तात्पुरत्या स्वरुपात स्थगीत करण्यात आला असून मा. ना. बच्चुभाऊ कडु यांच्या सूचनेनुसार नविन तारिख जाहीर करण्यात येईल अशी माहिती प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.....
0 टिप्पण्या