🌟पुर्णेतील बुद्ध विहारात आयोजित श्रामनेर शिबिराचा आज चौथा दिवस.....!


🌟श्रामनेर शिबिर दहा दिवस चालणार : शिबिरात विविध मान्यवरांनी लावली उपस्थिती🌟 

पुर्णा : पुर्णा शहरातील बुद्ध विहारात दहा दिवसांच्या श्रामनेर शिबिरास अखिल भारतीय भिक्खू संघाचे कार्याध्यक्ष भदंत.डॉ.उपगुप्त महाथेरो,भंते पय्यावंश यांच्या मार्गदर्शनाखाली दि.२१ ऑक्टोबर २०२३ रोजी सुरुवात झाली असून या शिबिराचा आज चौथा दिवस असून शिबिरात २१ श्रामनेर प्रशिक्षणार्थींनी सहभागी नोंदवला आहे त्यांचा पब्जजाविधी डॉ.उपगुप्त महाथेरो यांच्या हस्ते पार पडला आहे.

 या दहा दिवसांच्या श्रामनेर शिबिरात श्रामनेर भिक्खु संघाचे विनय,त्रिशरण-पंचशील,त्रिरत्न वंदना अर्थासहित मुखोदगत करणे बुद्ध,धम्म विचार प्रणाली समजाऊन घेणे.त्या नुसार आचरण करणे,या विषयी अभ्यासू भिक्खुसंघ मार्गदर्शन करीत आहे पुर्णेतील बुध्द विहारात सन १९७७ पासून श्रामणेर शिबिरांचे सातत्यपूर्ण आयोजन केले जाते आता पर्यंत १००० पेक्षा जास्त श्रामनेर शिबिरातून तयार झाले आहेत या शिबिरात उपासक/उपासिकांनसह प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करतांना भदंत डॉ.उपगुप्त महाथेरो यांनी शिबिर आयोजना पाठी मागील भूमिका विषद केली.

भंते पयावंश यांनी प्रास्ताविक केले. व सूत्रसंचलन श्रीकांत हिवाळे सर यांनी केले.यावेळी बुद्ध विहार समिती,धम्म सेवेमध्ये कार्यरत असलेली महिला मंडळ,भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या