🌟पुर्णेतील हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना झालाय गोरगरीब रुग्णांसाठी पोरका ?


🌟तज्ञ डॉक्टरांसह आरोग्य कर्मचारीही नसतात पुर्णवेळ हजर🌟

🌟राज्याच्या निष्क्रिय आरोग्य सेवेच्या शर्यतीत पुर्णेतील आरोग्यसेवा ही आघाडीवर🌟


पुर्णा (दि.२० ऑक्टोंबर) :- पुर्णा शहरातील नगर परिषद अग्निशमन दलाच्या इमारतीत ०१ मे २०२३ रोजी ऑनलाईन विडीओ कॉलीगद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ झालेल्या हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याची वेळ दुपारी २:०० ते रात्री १०:०० आसुन संध्याकाळी ७:०० नंतर दवाखाना बंद आसतो तर कधी कधी एकटा लॅब टेक्निशियनच हजर आसतो या दवाखान्यात डॉक्टर,नर्स,लॅब टेक्निशियन कार्यरत आसुन खाजगी गुत्तेदाराने आर्थिक हितसंबंध जोपासत भरती केलेले चार कर्मचारी आहेत त्यांना गुत्तेदारी पध्दतीने रुजु करुन घेत असताना दुपारी २:०० ते रात्री १०:०० हे वेळ ठरवुन दिलेला आसुन ही ते कर्मचारी सात वाजताच निघुन जातात आम्ही पैसे भरलेत आम्हाला कोण काय म्हणणार अशा भाषेत दवाखान्यात येणाऱ्या रुग्णांसह नातेवाईकांना देखील बोलतात दिसतात या दवाखान्यात हजर आसलेल्या लॉब टेक्निशियनला विचारले आसता ते म्हणतात सगळ्या महीला कर्मचारी आहेत म्हणुन आम्ही त्यांना लवकर सुट्टी करतोत व दवाखान्यात नियुक्त डॉक्टर साहेबांचं घर जवळच असल्याने दवाखान्यात रुग्ण आल्यास  मी त्यांना ताबडतोब बोलावतो दवाखान्यात रुग्णच नाही तर डॉक्टरची काय गरज आहे असं देखील लॉब टेक्निशियन कडून बोललं जातं या आपला दवाखान्यात डॉक्टर व आरोग्य कर्मचारी सतत गैरहजर राहत असल्याने रुग्ण व रुग्णांचे नातेवाईक दवाखान्यात येऊन वेळोवेळी येवून परत जातात त्यामुळे 'हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना' असून देखील गोरगरीब गरजवंत रुग्णांसाठी निरुपयोगी ठरत असल्यामुळे या हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याकडे रुग्णाचा कल वाढत नसल्याचे निदर्शनास येत असून या दवाखान्यात कार्यरत डॉक्टर व आरोग्य कर्मचारी रुग्णांना वेळेवर आरोग्य सुविधा उपलब्ध करुन न देता घरबसल्या शासकीय वेतन उचलत असल्याची जोरदार चर्चा शहरातील नागरीकांमध्ये होतांना दिसत आहे हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्या झालेल्या या दयनीय अवस्थेकडे वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांनी तात्काळ लक्ष देवून दवाखान्याचा कारभार सुधारण्यासाठी कठोर पावलं उचलावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या