🌟महसूल मुख्य सचिव हाजिर हों....गुरुद्वारा बोर्ड निवडणूक अवमान याचिका प्रकरणी न्यायालयाचा राज्य सरकारला दणका...!


🌟सचखंड गुरुद्वारा बोर्डाचा कार्यकाळ 9 एप्रिल 2022 रोजी संपला आहे🌟     

नांदेड (प्रतिनीधी) - नांदेड येथील सचखंड हुजूर साहिब गुरुद्वारा बोर्डाचा कार्यकाळ संपल्या नंतरही निवडणूक प्रक्रिया सुरू केली नसल्याने याबाबत सामाजिक कार्यकर्ते जगदीपसिंग नंबरदार यांनी कोर्टामध्ये महसूल विभागाचे मुख्य सचिव विरोधात अवमान याचिका दाखल केली होती यावर निर्णय देत न्यायालयाने महसूलचे मुख्य सचिवांना व्यक्तीश: हजर होण्याचे आदेश दिल्याने राज्य सरकारला दणका दिल्याची चर्चा होत आहे.

      सचखंड गुरुद्वारा बोर्डाचा कार्यकाळ 9 एप्रिल 2022 रोजी संपला आहे. बोर्डाच्या नियमानुसार मुदत संपण्याच्या सहा महिने आधी निवडणूक प्रक्रिया सुरू करणे बंधनकारक होते. परंतु राज्य शासनाकडून निवडणूक संदर्भात कोणतीही हालचाल करण्यात आली नाही. त्यामुळे गुरुद्वारा बोर्डाच्या कामकाज बाधित होऊन अनेक कामे प्रलंबित राहत असल्याने सामाजिक कार्यकर्ते जगदीपसिंग नंबरदार यांनी उच्च न्यायालयात याचीका दाखल असता 3 महिन्य च्या आत प्रक्रिया सुरु करण्याच आदेशाच्या अवमान प्रकरणी उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाचे न्यायाधीश आर.जी . अवचट आणि संजय देशमुख यांनी दिनांक 19 ऑक्टोबर 2023 रोजी महसूल विभागाचे मुख्य सचिवांना 10 डिसेंबर 2023 रोजी होणाऱ्या सुनावणीसाठी व्यक्तिशः हजर होण्याचे आदेश दिले आहेत. मुख्य सचिवांना हजर होण्याचे आदेश दिल्याने राज्य सरकारला मोठा दणका दिला असल्याचे चर्चा होत आहे. याचिका कर्त्यांकडून अँड. मृगेश नरवाडकर यांनी बाजू मांडली.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या