🌟नवरात्र महोत्सव मंडळांसह महापरुषांची स्मारक सर्वधर्मीयांची धार्मिक स्थळांच्या सुरक्षाव्यवस्थेला प्राथमिकता🌟
🌟गुन्हेंगारी कारवायांकडे देखील पोलीस प्रशासनानचे विशेष लक्ष🌟
पुर्णा (विशेष वृत्त - चौधरी दिनेश): पूर्णा पोलीस स्थानकाचे कर्तव्यदक्ष पोलीस प्रदीप जी काकडे व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री ब्रह्मदेव गावंडे यांनी शहरासह तालुक्यातील कायदा व सुव्यवस्थेकडे विशेष लक्ष केंद्रित केल्याचे निदर्शनास येत असून येत असून शहरासह तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी याकरिता संबंधित अधिकारी २४ तास डोळ्यात तेल घालून आपले कर्तव्य बजावत असल्याचे निदर्शनास येत आहे पोलीस प्रशासनाच्या या अत्यंत कौतुकास्पद मोहीमेत पुर्णा पोलीस स्थानकात कार्यरत अन्य अधिकारी/कर्मचारी देखील त्यांच्या खांद्याला खांदा लावून व कर्मचाऱ्यांचे पथके तयार करून शहरासह तालुक्याला लागलेला अतिसंदनशीलतेचा कलंक पुसण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेत असल्याचे निदर्शनास येते आहे.
पोलीस प्रशासन व सर्वसामान्य जनतेत समन्वय साधण्यासाठी देखील पुर्णा पोलीस स्थानकाचे अत्यंत कर्तबगार व कर्तव्यदक्ष पोलिस निरीक्षक प्रदीपजी काकडे हे सातत्याने प्रयत्नशील असल्याचे निदर्शनास येत असून त्यांनी पुर्णा पोलिस स्थानकाचा पदभार स्विकारल्यानंतर शहरासह तालुक्यातील जनसामान्यांमध्ये पोलीस प्रशासना विषयीं आदराचे वातावरण निर्माण झाल्याचं पाहावयास मिळत आहे पुर्णा पोलीस स्थानकाला प्रदीपजी काकडे यांच्या रूपाने प्रथमच एक असे अधिकारी लाभले जे शहरासह तालुक्याला लागलेला अतिसंदनशीलतेचा कलंक कायमस्वरूपी पुसण्याचा प्रयत्न करीत आहे.
सार्वजनिक गणपती महोत्सव असो की ईद-ए-मिलाद किंवा महापरुषांचे जयंती महोत्सव किंवा दुर्गादेवी नवरात्र महोत्सव प्रत्येक उत्सव शांततेत कसे साजरे होतील या दृष्टीने नियोजनबद्ध सुरक्षा व्यवस्था उभी करण्याचे कार्य पोलीस निरीक्षक प्रदीपजी काकडे करीत असल्यामुळे त्यांची कार्यतत्परता व कर्तव्यदक्षता यातून दिसून येते पुर्णा शहरात नवरात्र महोत्सवास सुरुवात झाल्यापासून त्यांनी दमिनी पथक कार्यान्वित करुन नवरात्र मंडळांसह परिसरात आयोजित दांडीया महोत्सवात गदारोळ माजवणाऱ्यांवर प्रतिबंध लागावा व महिला/मुलींची छेडछाड होता कामा नयें याकडे विशेष लक्ष केंद्रित केल्याचे दिसत आहे दर्गा महोत्सवा निमित्त होणाऱ्या रावणदहन,दुर्गा विसर्जन तसेच बौद्ध धर्मियांच्या धम्मचक्र परिवर्तन दिन, लिंगायत समाजाचे गुरू श्री नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज यांचा पालखी सोहळा शांततेत साजरा व्हावा या करीता पो.नि.काकडे व उपविभागीय पोलिस अधिकारी ब्रह्मदेव गावडे हे सातत्याने प्रयत्नशील असल्याचे ते राबवत असलेल्या विशेष मोहीमेतून दिसुन येत आहे.
पुर्णा शहरासह तालुक्यात वाढलेली पोलीस दिवसास रात्री ची गस्त पेट्रोलिंग तसेच शहरासह तालुक्यातील सर्वधर्मीयांच्या धार्मिक स्थळांच्या सुरक्षाव्यवस्थेला दिल्या गेलेली प्राथमिकता यावरून त्यांच्या कर्तव्य तत्परतेची शहरासह तालुक्यातील नागरीकांना जाणीव होत आहे.
पुर्णा पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक प्रदीपजी काकडे यांच्या दिशानिर्देशाखाली व उपविभागीय पोलिस अधिकारी ब्रह्मदेव गावडे यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली पुर्णा पोलिस स्थानकात कार्यरत अधिकारी/कर्मचारी आपआपले कर्तव्य जवाबदारी बजावत असल्याचे निदर्शनास येत आहे आपले कर्तव्य अत्यंत काटेकोरपणे बजावत असतांना निरपराध कायद्याच्या कचाट्यात अडकता कामा नयें आणि अपराधी कायद्याच्या कचाट्यातून कद्दापी सुटता कामा नयें अशी विशेष खबरदारी बाळगणारे कर्तव्य कठोर अधिकारी म्हणून पो.नि.प्रदिपजी काकडे यांची कारकीर्द राहिली असल्यामुळे ते निश्चितच पुर्णा पोलीस स्थानकात कार्यरत असेपर्यंत शहरासह तालुक्यातील सर्वसामान्य जनता स्वतःला सुरक्षित समजून मोकळा श्वास घेत राहील यात तिळमात्र शंका नाही...
0 टिप्पण्या