🌟परभणीतील असोला येथे ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त 97 जणांची आरोग्य तपासणी.....!


🌟आयोजित शिबिरात 97 ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली🌟

परभणी : समाजकल्याण विभागातर्फे स्नेह महिला निराधार गृह, असोला येथे ज्येष्ठ नागरिक दिन नुकताच साजरा करण्यात आला. यानिमित्त आयोजित शिबिरात 97 ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.  

कार्यक्रमाच्या अध्यक्ष समाजकल्याण विभागाच्या सहायक आयुक्त श्रीमती गीता गुठ्ठे होत्या. तर प्रमुख पाहुणे मुकुंद नंद, डॉ. भारत नांदोरे, राजेश देशमुख, श्रीमती मंजुषा नरवाडकर, श्रीमती मनिषा माने, डॉ. तृप्ती पोरवाल उपस्थित होत्या. 

ज्येष्ठ नागरिकांसाठी आई-वडील व ज्येष्ठ नागरिक यांच्या चरितार्थ अधिनियम 2007 तसेच 2013 चे सर्वसमावेशक ज्येष्ठ नागरिक धोरणांची अंमलबजावणी करण्याबाबत माहिती देत ज्येष्ठ नागरिकांनी सुसह्य व आनंदी जीवन जगण्याविषयी प्रमुख पाहुणे मुकुंद नंद यांनी मार्गदर्शन केले.  

आई वडील व ज्येष्ठ नागरिकांचा चरितार्थ व कल्याणासाठी अधिनियम 2007 नियम 2010 या कायद्याविषयी मार्गदर्शन केले तसेच पाल्यांनी आपल्या पालकांची काळजी घेण्याचे आवाहन श्रीमती गुठ्ठे यांनी केले. श्रीमती गंगासागर पांचाळ यांनी वृद्धाश्रमावरील गीत सादर केले. यावेळी महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.  

स्नेह महिला निराधार गृहाच्या अध्यक्षा श्रीमती सुनिता अहिरे यांच्यासह मातोश्री वृद्धाश्रमातील वृद्ध व इतर ज्येष्ठ नागरिक हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार रेवणअप्पा साळेगावकर यांनी मानले....... 

 *****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या