🌟असे सामाजिक न्याय विभागाच्या सहायक आयुक्त श्रीमती गीता गुठ्ठे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे🌟
परभणी (दि.20 ऑक्टोंबर) : सामाजिक न्याय विभागाच्या जिल्ह्यातील शासकीय वसतिगृहामध्ये विद्यार्थी- विद्यार्थिनींना सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षासाठी मोफत प्रवेश घेण्यासाठी ३१ ऑक्टोबर २०२३पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याचे सामाजिक न्याय विभागाच्या सहायक आयुक्त श्रीमती गीता गुठ्ठे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
शासकीय वसतिगृहातील प्रवेश प्रक्रिया आयुक्त समाज कल्याण आयुक्तालय, पुणे यांच्या परिपत्रकान्वये व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशाबाबत ही मुदतवाढ ३१ आक्टोबर २०२३ करण्यात आली असून, पात्र व पात्र विद्यार्थी-विद्यार्थिनींनी ३१ ऑक्टोबरपर्यंत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावेत. शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्यास पात्र व इच्छुकांना संबंधित मागासवर्गीय मुला-मुलींचे शासकीय वसतिगृह परभणी, मानवत, सेलू, पुर्णा व गंगाखेड या वसतिगृहांकडून विनामूल्य अर्ज उपलब्ध असून, आवश्यक कागदपत्रांसह वसतिगृहाकडे सादर करावेत, असे आवाहन सहाय्यक आयुक्त श्रीमती गीता गुठ्ठे यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, परभणी यांच्याकडे (दूरध्वनी क्र. ०२४५२- २२०५९५) संपर्क साधावा किंवा संबंधित वसतिगृहातील गृहपालाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.......
0 टिप्पण्या