🌟राज्यभरातील खर्च न केलेला निधी खर्च करण्यास फेब्रुवारी 2024 ची डेडलाईन.....!

 


🌟28 फेब्रुवारी 2024 नंतर अखर्चित असलेला निधी 5 मार्च 2024 पर्यंत सरकारकडे जमा करणे बंधनकारक🌟 


राज्यातील महापालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदा या स्थानिक स्वराज्य संस्थांबरोबरच शासनाच्या विविध विभागांना दिलासा देत अखर्चित निधी फेब्रुवारी 2024 पर्यंत खर्च करण्यास वित्त विभागाने मान्यता दिली आहे. राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे- व उपमुख्यमंत्री फडणवीस सरकार जून 2022 मध्ये सत्तारूढ झाले होते. मात्र, त्या आधीच मार्च 2022 मध्ये तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने अर्थसंकल्प सादर केलेला होता.

31 मार्च 2022 पूर्वी वितरित केलेला व 31 मार्च 2023 पर्यंत खर्च करणे अपेक्षित असलेला; परंतु अखर्चित असलेला निधी 28 फेब्रुवारी 2024 पर्यंत खर्च करता येईल. स्थानिक स्वराज्य संस्था व प्राधिकरणे वगळून इतर विभागांनी 31 मार्च 2023 पूर्वी कोषागारातून आहरित केलेला; परंतु बँक खात्यामध्ये अखर्चित असलेला निधी खर्च करण्यास 28 फेब्रुवारी 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.  

28 फेब्रुवारी 2024 नंतर अखर्चित असलेला निधी 5 मार्च 2024 पर्यंत सरकारकडे जमा करणे बंधनकारक असेल. तसे न करणाऱ्या  अधिकाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई केली जाईल.....

 ✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या