🌟मलेरियाच्या दुसऱ्या लसीला ‘डब्ल्यूएचओ’ने दिली मान्यता ; 2024 च्या अखेरपर्यंत होणार उपलब्ध.....!


🌟पुढील वर्षीच्या सुरुवातीला मलेरिया या दुसर्‍या लसीचा वापर काही आफ्रिकन देशांत केला जाणार🌟

जागतिक आरोग्य संघटनेने मलेरियाची दुसरी लसीला मंजुरी दिली. आता ही लस डासांपासून होणारा प्राणघातक मलेरिया रोखण्यास फायदेशीर ठरणार आहे. दोन वर्षांपूर्वी ‘डब्ल्यूएचओ’ने मलेरियाच्या ‘आरटीएस-एस’ या पहिल्या लसीला मंजुरी दिली आहे. आता नवीन लस 2024 च्या अखेरपर्यंत जगभरासाठी उपलब्ध होणार आहे. 


पुढील वर्षीच्या सुरुवातीला मलेरिया या दुसर्‍या लसीचा वापर काही आफ्रिकन देशांत केला जाणार आहे; तर दुसरीकडे अन्य देशांत 2024 चा मध्य आणि अखेरीस ही लस उपलब्ध होऊ शकेल. ‘डब्ल्यूएचओ’चे महानिदेशक टेड्रस अधानम घेब्रेयेसस यांनी सांगितले की, संयुक्त राष्ट्र संघाच्या आरोग्य यंत्रणेच्या दोन विशेषज्ञांच्या पथकाच्या सल्ल्यानुसार मलेरियाच्या नव्या लसीला मान्यता दिली आहे. 

या लसीची मात्रा दोन अथवा चार डॉलरला विकली जाईल. याबाबत महाराष्ट्रातील पुणेस्थित सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियानेही याला दुजारो दिला आहे. या लसीची निर्मिती करण्यासाठी ‘डब्ल्यूएचओ’ने सिरम इन्स्टिट्यूटला परवाना दिली आहे..... 

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या