🌟कारंजा (लाड) उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाकडून गहाळ झालेले 12 मोबाईल मुळ मालकांना परत....!

 


🌟CEIR पोर्टल च्या माध्यमातून आतापर्यंत 70 गहाळ झालेल्या मोबाईलचा शोध घेण्यात आला🌟

फुलचंद भगत

वाशिम :- कारंजा लाड येथे दिनांक 20 उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाकडून कारंजा तालुक्यातील 12 जणांचे मोबाईल गहाळ झाल्याच्या तक्रारीवरून सी. ई. आय. आर. पोर्टल वरून शोध घेऊन पोलिस अधीक्षक श्री बच्चन सिंह सा व उपविभागीय पोलीस अधिकारी जगदिश पांडे यांच्या हस्ते तक्रारदारास दि.20 सप्टेंबर रोजी परत करण्यात आले. परत करण्यात आलेल्या 12 मोबाईलची किंमत अंदाजे एक लाख विस हजार रुपयांच्या जवळपास होती. या संदर्भात हरवलेल्या नागरिकांनी पोलिसात तक्रार दिली त्यावरून CEIR पोर्टल च्या माध्यमातून आतापर्यंत 70 गहाळ झालेल्या मोबाईलचा शोध घेण्यात आला. 

या कार्यावाही मध्ये सायबर पोलिस स्टेशन चे पोलीस निरीक्षक भुषन गावंडे, पोकॉ वैभव गाडवे, मपोकॉ पुष्षा मनवर यांनी सहकार्य केले. यामुळे तक्रारदार यांनी समाधान व्यक्त केले.मोबाईल गहाळ झाल्यास संबंधित पोलिस स्टेशन ला तक्रार नोंदवावी असे आवाहन सायबर पोलिस स्टेशन वाशिम च्या वतीने करण्यात आले.

प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम

मो.8459273206

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या