🌟परभणी काँग्रेस पक्षा वतीने लाठीचार्ज निषेधार्थ मोर्चाचे आयोजन....!



🌟परभणी काँग्रेस कमिटीची तातडीची बैठक संपन्न🌟

✍🏻प्रभाकर कुर्हे चारठाणकर

परभणी (दि.०६ सप्टेंबर २०२३) - मराठा आंदोलकांनवर झालेल्या अमानुष लाठीचार्ज निषेधार्थ परभणी जिल्हा काँग्रेस कमिटीची तातडीची बैठक आज दि 6 सप्टेंबर रोजी सकाळी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा जिल्हाध्यक्ष आ.सुरेशरावजी वरपुडकर यांनी तातडीची बैठक बोलावून दि. 7 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चाचे आयोजिन करण्यात आले आसुन या मोर्चा च्या माध्यमातून परभणी जिल्हा 100% दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करण्यात येणार आहे.


 दुपारी 1:00 वाजता काँग्रेस कमिटी जिल्हा कार्यालय शनिवार बाजार येथुन निघनार आहे.या वेळी जिल्हा कार्याध्यक्ष नानासाहेब राऊत यांनी निषेध ठराव मांडला व त्यास रामभाऊ घाटगे यांनी अनुमोदन दिले मराठा बांधवांनसह काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले या वेळी जिल्हाध्यक्ष आ.सुरेशरावजी वरपुडकर, जिल्हा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष तुकाराम रेंगे पाटील, मा. आ. सुरेशरावजी देशमुख, जिल्हा कार्याध्यक्ष नानासाहेब राऊत, मा.उपमहापैर भवानरावजी वाघमारे, शहर जिल्हाध्यक्ष नदिमजी इनामदार, जि. प. मा उपाध्यक्ष रामभाऊ घाटगे, जिंतूर तालुकाध्यक्ष गणेशरावजी काजळे,महिला शहर जिल्हाध्यक्ष दुर्रानी मॅडम,मलेका गफार मॅडम, महापालिका मा. सभापती गुलमिरखान, नागसेन भेरजे, सेलु शहराध्यक्ष शेख दिलावर, आर्जुन वजिर, सुहास पंडित,तहेसिन देशमुख आदींसह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या