🌟पाथरी तालुक्यात अतिवृष्टी तर पुर्णा तालुक्यात सर्वात कमी ५.६ मिलीमीटर पावसाची नोंद🌟
परभणी (दि.२४ सप्टेंबर २०२३) : जिल्ह्यात मागील २४ तासात यंदाच्या पावसाळ्यातील सर्वाधिक पावसाची नोंद झाली असून, सरासरी २७.१ मिलीमीटर पाऊस पडला आहे. जिल्ह्यातील पाथरी तालुक्यात अतिवृष्टी (६६.५मिमी) झाली असून, त्याखालोखाल मानवत तालुक्यात (५१.४) पाऊस झाला आहे. याशिवाय सोनपेठ (२८), गंगाखेड (२५.२), परभणी (२४.७), जिंतूर (२२.२), पालम (१९.९), सेलू (१८.८), आणि पुर्णा तालुक्यात सर्वात कमी (५.६ मि.मी.) पावसाची नोंद झाली आहे.
छत्रपती संभाजीनगर विभागाचा विचार करता, गेल्या २४ तासातील विभागात पडलेल्या पावसाची सरासरी ही परभणी जिल्ह्यात पडलेल्या सरासरीपेक्षा कमी असून, ती २६.५ मिलीमीटर राहिली आहे......
*****
0 टिप्पण्या