🌟महाराष्ट्रातील नामवंत किर्तनकार प्रवचनकार गायक यांची उपस्थिती🌟
पुर्णा (दि.२२ सप्टेंबर २०२३) - पुर्णा तालुक्यातील माटेगाव येथे वै.ब्रम्हीभुत श्री संत मोतीराम महाराज ह.भ.प. कोंडजी बापू दिग्रसकर महाराज ह.भ.प.मारोतराव महाराज दस्तापुरकर यांच्या कृपा प्रसादाने चालू असलेल्या अखंड हरिनाम सोहळ्याचे यंदा सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे यावर्षी हा सप्ताह मोठ्या उत्साहात पार पडणार असून महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार, प्रवचनकार, गायक,यांची उपस्थिती लाभणार आहे आज शुक्रवार दिनांक २२ सप्टेंबर पासून प्रारंभ झाला आहे
या सप्ताहाची ऑक्टोबरला समारोप होईल यानिमित्त काकडा आरती , विष्णुसहस्त्रनाम, ज्ञानेश्वरी पारायण, संत तुकाराम गाथा भजन, भावार्थरामायण, ज्ञानेश्वरी प्रवचन, आदी दैनंदिन कार्यक्रमासह रात्री किर्तन होणार आहे.पहिल्या दिवशी नारायण महाराज टाकळीकर यांचे कीर्तन बाबुराव पांचाळ यांचे प्रवचन २३ सप्टेंबरला नितीन सावंत परभणीकर यांचे कीर्तन राम महाराज बनसोडे यांचे प्रवचन २४ सप्टेंबरला नागनाथ महाराज कुडाळेकर यांचे कीर्तन उत्तमराव बोबडे यांचे प्रवचन २६ सप्टेंबरला ज्ञानोबा माऊली मुडेकर गंगाखेड यांचे कीर्तन डिगांबर गुरुजी काळे एरंडेश्वरकर यांचे प्रवचन २६ सप्टेंबरला पांडुरंग महाराज शितोळे आळंदी( दे) यांचे कीर्तन दीपक जोशी गुरु यांचे प्रवचन २७ सप्टेंबरला ज्ञानेश्वर भारती खडकवाडीकर यांचे कीर्तन कामाजी भोसले सुगाव यांचे प्रवचन २८ सप्टेंबरला महादेव महाराज राऊत (बीड) यांचे कीर्तन भगवान ढोणे गुरुजी यांचे प्रवचन २९ सप्टेंबरला ज्ञानेश्वर महाराज पफाळ (सोनपेठ) यांचे कीर्तन सोपानकाका बोबडे यांचे प्रवचन ३० सप्टेंबरला एकनाथ महाराज सदगीर( ठाणे) यांचे कीर्तन, पांडुरंग भुसारे नावकी यांचे प्रवचन, १ ऑक्टोबरला उमेश महाराज दशरथे आळंदी (दे )यांचे कीर्तन,लोणसणे गुरुजी यांचे प्रवचन, २ ऑक्टोबरला सकाळी ११ ते १ अच्युत महाराज दस्तापुरकर यांचे पूजेचे कीर्तन, रात्री जगन्नाथ पाटील महाराज (ठाणे) यांचे कीर्तन, ३ ऑक्टोबरला जगन्नाथ पाटील महाराज (ठाणे) काल्याचे किर्तन होणार आहे
0 टिप्पण्या