🌟परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात सैनिकांच्या सन्मानार्थ २९ सप्टेंबर शौर्य दिन साजरा करणार.....!



🌟 कार्यक्रमास माजी सैनिकांच्या कुटूंबीयांनी उपस्थित राहावे - श्रीमती अनुराधा ढालकरी


परभणी (दि.२५ सप्टेंबर २०२३) : भारतीय सैन्य दलाने पाकिस्तानाच्या हद्दीत घुसून २९ सप्टेंबर २०१६ रोजी सर्जीकल स्ट्राईकद्वारे दहशवाद्यांचा बिमोड केला. भारतीय सैन्याची ही अभिमानास्पद कामगिरी राज्यातील जनतेपर्यंत पोचविण्यासाठी व माजी सैनिकांचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी  २९ सप्टेंबर रोजी ‘शौर्य दिन’ साजरा करण्याचे राज्य शासनाने निश्चित केले आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात या दिवशी होणाऱ्या कार्यक्रमास माजी सैनिकांच्या कुटूंबीयांनी उपसि्थत राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सैनिकांप्रती असलेली आदराची भावना समाजातील सर्व लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक, माजी सैनिकांच्या विधवा, शहीद जवानांचे कुटूंबीय यांचा जिल्हा प्रशासनाच्या वतीने या दिवशी सत्कार करण्यात येणार आहे.

तरी सर्व माजी सैनिक, माजी सैनिकांच्या विधवा, शहीद जवानांचे कुटूंबीयांनी  २९ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ११.३० वाजता जिल्हा नियोजन हॉल, जिल्हाधिकारी कार्यालय, परभणी येथे उपस्थित राहण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी श्रीमती अनुराधा ढालकरी यांनी केले आहे.
*****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या