🌟सकल मराठा समाजाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या बंदला मिळाला उस्फुर्त प्रतिसाद🌟
परभणी/पुर्णा (दि.०२ सप्टेंबर २०२३) - परभणी जिल्ह्यातील पुर्णा शहरात आज शनिवार दि.०२ सप्टेंबर २०२३ रोजी सकल मराठा समाजाच्या वतीने जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथे मराठा समाजाच्या आरक्षण प्रश्नावर लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या समाज बांधवांसह महिला माता भगिनी तसेच कार्यकर्त्यांवर पोलिसांनी अमानुषपणे लाठीचार्ज केल्याच्या निषेधार्थ आज शनिवार दि.०२ सप्टेंबर २०२३ रोजी सकल मराठा समाजाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या बंदला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील त समाज बांधवांचे लोकशाही मार्गाने आंदोलन सुरू होते. हे आंदोलन मागे घ्यावे यासाठी पोलीस प्रशासनाने आंदोलकावर दबाव आणला होता. यामुळे पोलिसांनी आंदोलन कर्त्यावर लाठीचार्ज व गोळीबार केला आहे. यात आंदोलन करते गंभीर जखमी झाले. या घटनेचा निषेध करण्यासाठी पुर्णा शहरात सकाळी ०८-०० वाजल्यापासून बाजारपेठेमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला.
शहरातील मुख्य बाजारपेठ,सोनार गल्ली,जुना मोंढा,महात्मा बसवेस्वर चौक,छत्रपती शिवाजी महाराज चौक,डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक,महाविर चौक,स्वामी दयानंद सरस्वती चौक,भाजी मार्केट,नवा मोंढा,रेल्वे स्थानक परिसर,बसस्थानक परिसर,झिरो टी पॉईंट आदी परिसरातील व्यापारी प्रतिष्ठान कडकडीत बंद होती शहरातील सर्वच बाजारपेठेतील दुकाने बंद ठेवून व्यापाऱ्यांनी या बंदमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविला आहे.सकल मराठा समाजाच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले असून या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला आहे.....
0 टिप्पण्या