🌟पुर्णा शहरासह तालुक्यात एकूण ९० सार्वजनिक गणपती मंडळांची स्थापना : ९० पैकी ३५ गणेश मंडळांनी घेतले परवाने...!


🌟शहरात २५ गणेश मंडळांनी श्री गणेशाची स्थापना🌟

पूर्णा शहरासह तालुक्यात एकूण ९० सार्वजनिक श्री गणेश मंडळांची स्थापना करण्यात आली असून यात शहरातील २५ सार्वजनिक गणेश मंडळांनी समावेश आहे.

पुर्णा शहराच्या हद्दीत स्थापन झालेल्या २५ सार्वजनिक गणेश मंडळांपैकी केवळ १० गणेश मंडळांनी अधिकृत परवाने घेतलेले असून १५ गणेश मंडळांनी अद्याप पर्यंत अधिकृत परवाने घेतलेले नाहीत तर पूर्णा तालुक्यातील ग्रामीण भागात एकूण ६५ गणेश मंडळांची स्थापना झालेली असून यातील २५ गणेश मंडळांनी अधिकृत परवाने घेतलेले असून ४० गणेश मंडळांनी अद्याप पर्यंत अधिकृत पर्वाने घेतलेले नाहीत तर चुडावा पोलीस स्थानकाच्या हद्दीत एकूण सात सार्वजनिक गणेश मंडळांची स्थापना करण्यात आलेली यातील एकही गणेश मंडळाने अधिकृत परवाना काढलेला नसल्याचे पोलीस सूत्रांकडून समजते पुर्णा तालुक्यातील चुडावा पोलीस स्थानकाच्या हद्दीत चुडावा गावासह ग्रामीण भागामध्ये एकूण ८५ सार्वजनिक गणेश मंडळांची स्थापना झालेली असून यात ३० परवानाधारक गणेश मंडळांचा समावेश आहे तर ५५ विनापरवाना गणेश मंडळांचा समावेश आहे.

पूर्णा शहरासह तालुक्यात काल मंगळवार दि.१९ सप्टेंबर २०२३ रोजी सर्वत्र शांततेत ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत श्री गणेशाची स्थापना झाली यावेळी पुर्णा स्थानकाचे पोलीस निरीक्षक प्रदीपजी काकडे व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री गावडे यांनी सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवला होता यावर्षी श्री गणेश महोत्सवाच्या धामधूमीवर दुष्काळाचे सावट दिसून येत आहे....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या