🌟पुर्णा शहरातील आनंद नगर परिसरात गणेश विसर्जन मिरवणुकीवर टोळक्याचा सशस्त्र हल्ला : अध्यक्षासह अन्य तिघे जखमी...!


🌟अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्यासह उपविभागीय पोलीस अधिकारी गावडे यांची घटनास्थळाला भेट🌟

पुर्णा शहरात अनंत चतुर्दशी दिनी काल गुरुवार दि.२८ सप्टेंबर २०२३ रोजी सर्वत्र शांततेत मिरवणूक सुरू असताना सायंकाळी ०७-३० ते ०८-०० वाजेच्या सुमारास शहरातील आनंद नगर परिसरातील आनंद गणेश मंडळाची मिरवणुक वाजत गाजत निघाली असतांना या गणेश मंडळांच्या मिरवकीवर एका टोळक्याने सशस्त्र हल्ला चढवल्याची दुर्दैवी घटना घडली या घटनेत आनंद गणेश मंडळाचे अध्यक्ष अजय शंकर गलांडे यांच्यासह अन्य दोन जन गंभीर जखमी तर एक जन किरकोळ जखमी झाला असून यातील तिघांना नांदेड येथील विष्णुपूरीतील डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात पुढील उपचारासाठी भरती करण्यात आले आहे.


पुर्णा शहरातील कायदा व सुव्यवस्थेला सातत्याने गालबोट लावणाऱ्या घटना घडत असल्याने या घटना घडण्याचे नेमके कारण काय ? या प्रश्नाचे उत्तर शोधण्याची वेळ पोलीस प्रशासनावर आलेली असून आनंद नगर परिसरातील आनंद गणेश मंडळाच्या गणपती विसर्जन मिरवणुकीवर झालेल्या सशस्त्र हल्ल्यामुळे स्थानिक पोलीस प्रशासनाच्या कर्तव्यदक्षतेवर प्रश्न चिन्ह निर्माण केला असल्याचे दिसत असून शहरात सर्वत्र पोलीस बंदोबस्तासह सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित असतांना देखील सात/आठ जनांच्या टोळक्यांनी खुलेआम गणपती विसर्जन मिरवणुकीवर सशस्त्र हल्ला चढवावा ही बाब निश्चितच गंभीर व कायदा व सुव्यवस्थेला काळीमा फासणारी म्हणावी लागेल या घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, उपविभागीय पोलिस अधिकारी श्री गावडे यांनी घटनास्थळी भेट देऊन शासकीय ग्रामीण रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली या घटने संदर्भात पुर्णा पोलीस स्थानकात अद्याप गुन्हा दाखल झालेला नसला तरी पुर्णा पोलीस प्रशासनाने सहा संशयितांना ताब्यात घेतले असल्याची माहिती हाती आली आहे....
टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या