🌟रद्द करण्यात आलेल्या नांदेड-पुणे-नांदेड एक्स्प्रेसच्या दोन फेऱ्या पूर्ववत धावणार.....!


🌟या दोन्ही रेल्वे नियोजित वेळा पत्रका नुसार धावतील याची प्रवाशांनी नोंद घ्यावी🌟

मध्य रेल्वे ने कळविल्यानुसार, या कार्यालयाने आज दिनांक 20 सप्टेंबर रोजी प्रेस नोट क्र. 579 नुसार  नांदेड येथून सुटणारी गाडी गाडी क्र. 17630 नांदेड-पुणे एक्स्प्रेस दिनांक 23 आणि 24 सप्टेंबर, 2023  आणि पुणे येथून सुटणारी गाडी क्र. 17629 पुणे-नांदेड एक्स्प्रेस दिनांक 24 आणि 25 सप्टेंबर, 2023 ला रद्द करण्यात  आल्याचे कळविले होते. 


* मध्य रेल्वे ने या गाड्या रद्द करण्याचा निर्णय मागे घेतला आहे :-

यामुळे, नांदेड येथून सुटणारी गाडी गाडी क्र. 17630 नांदेड-पुणे एक्स्प्रेस दिनांक 23 आणि 24 सप्टेंबर, 2023 ला  नियोजित वेळे नुसार धावेल. तसेच पुणे येथून सुटणारी गाडी क्र. 17629 पुणे-नांदेड एक्स्प्रेस दिनांक 24 आणि 25 सप्टेंबर, 2023 ला नियोजित वेळेनुसार धावेल या दोन्ही रेल्वे नियोजित वेळा पत्रका नुसार धावतील. याची प्रवाशांनी नोंद घ्यावी.....टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या