🌟मराठवाडा दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी एक लाख रुपयांची मदत द्या...!


🌟छत्रपती संभाजी सेनेची जिल्हाधिकारी श्री.गावडे यांच्या मार्फत मुख्यमंत्री मा.एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी🌟 


मराठवाडा दुष्काळग्रस्त जाहीर करून संपूर्ण मराठवाड्यासह परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी एक लाख रुपये मदत तात्काळ देण्यात यावी अशी मागणी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.एकनाथ शिंदे यांच्याकडे छत्रपती संभाजी सेनेच्या वतीने आज शुक्रवार दि.०१ सप्टेंबर २०२३ रोजी करण्यात आली आहे.   

संभाजी सेनेच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवण्यात आलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की मराठवाड्यात गेली अनेक दिवसापासून पावसाने दांडी मारल्यामुळे सर्वत्र पिके करपायला लागली आहेत जमिनीला अक्षरशः भेगा पडल्या आहेत मराठड्यातील अनेक आगात तब्बल २१ दिवसापेक्षा जास्त काळापासूत पाऊस पड़लेला नाही तर काही भागात अद्याप देखील पाऊसच पड़लेला नाही बऱ्याच भागात शेतकऱ्यांनी दुबार पेरणी करून सुद्धा त्यांची पिके करपत आहेत अश्या गंभीर परिस्थिती मुळे मराठवाड्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आणि निसर्गाच्या अनियमिततेमुळे हतबल झालेला शेतकरी नाईलाजास्तव आत्महत्येच्या वाटेवर जात आहे. या बिकट परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून आर्थिक मदतीची आवश्यकता असल्याने शासनाने शेतकऱ्यांना तात्काळ हेक्टरी एक लाख रुपये आर्थिक मदत द्यावी तसेच पिक विमा अग्रिम २५ % तात्काळ देण्यात यावा व संपूर्ण गराठवाड़ा दुष्काळग्रस्त जाहीर करावा या प्रमुख मागण्यांसाठी संभाजी सेनेच्या वतीने मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये दिनांक ০४ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ११-०० वाजता रास्ता रोको आदोलन करण्यात येणार आहे असा इशारा देखील देण्यात आला आहे.

निवेदनात पुढे असेही नमूद करण्यात आले आहे की अन्नदाता शेतकरी जगला पाहिजे त्याला बळ मिळावे यासाठी ज्या प्रमाणे आपण 'शासन आपल्या दारी' हा उपक्रम राबवत आहात त्या प्रमाणे शासनाने शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत करुन शासन शेतकऱ्यांच्या देखील दारी आहे अशा पद्धतीची भुमिका निभवावी आणि शेतकरी बांधवांना जगण्यासाठी बळ द्यावे या मागण्यांसाठी संभाजी सेना महाराष्ट्र या सामाजिक संघटनेच्या वतीने मराठवाड्यातील संपूर्ण जिल्ह्यांमध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे असे ही निवेदनात म्हटले असून या निवेदनावर संभाजी सेनेचे प्रदेशाध्यक्ष रामेश्वर शिंदे,परभणी जिल्हाध्यक्ष विठ्ठल तळेकर,जिल्हा संपर्क प्रमुख नारायन देशमुख,युवक जिल्हाध्यक्ष डिगांबर धोंडगे,शहराध्यक्ष अरूण पवार,विद्यार्थी शहराध्यक्ष सोनु पवार,प्रताप पवार,गजानन शिंदे,आदींच्या स्वाक्षरी आहेत...... 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या