🌟नांदेड शहरातील तिरंगानगर आणि रघुनाथनगर लेथील मतदार नोंदणी फॉर्म आ.बालाजी कल्याणकर यांना सुपुर्द.....!


🌟या दोन्ही नगरात रामचंद्र देठे यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत घरोघरी जाऊन केली नोदनी🌟

नांदेड (दि.१० सप्टेंबर २०२३) - तिरंगानगर आणि रघुनाथनगर तरोडा खुर्द येथील एकूण २६ महिला पुरूषांचे मतदार नोंदणी/मतदार स्थलांतर अर्ज लोकप्रिय आमदार बालाजीराव कल्याणकर दादा यांचेकडे आज सायंकाळी ७ वाजता सुपुर्द केले त्याप्रसंगी रामचंद्र देठे आणि श्रीकृष्ण वानखेडे उपस्थित होते.

या दोन्ही नगरात रामचंद्र देठे यांनी नांदेड जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत घरोघरी जाऊन मतदानाचे महत्त्व सांगून १८ वर्षं पूर्ण होणाऱ्या  महिला पुरूषांचा नवीन मतदार नमुना भरून घेतला. ज्याना मतदान कार्ड स्थलांतर करायचे आहे त्यांचा स्थलांतर नमुना भरून घेतला येथील महिला पुरूषांना व्हाट्सअप ग्रुपद्वारेही माहिती देऊन आवाहन केले.देठे यांनी हे सामाजिक कार्य म्हणून शासनाकडून अथवा जनतेकडून विना मोबदला केले.त्यामुळे त्यांचे कौतुक होत आहे.........

                 *********

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या