🌟महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांना खा.जाधवांनी पुन्हा ठणकावले🌟
प्रतिनिधी - पाथरी
पाथरी:-बाभळगाव मंडळ आणि पाथरी मंडळातील गोदा काठा कडील गावे अद्यापही तहानलेलीच आहेत.या गावातील शेतक-यांनी जायकवाडीचे चालु आवर्तन सोडावे अशी मागणी मागिल आठवडा भरा पासुन करुन ही अधिकारी या कडे जाणिव पुर्वक दुर्लक्ष करत असल्याची भावना शेतकरी व्यक्त करत होते.गावागावातुन फोनवरुन विचारणा केल्यावर अधिकारी निवेदनाची मागणी करू लागल्याने आज अनेक गावांतील शेकडो शेतक-यांनी पाणी सोडण्याची मागणी केल्या नंतर ही अधिका-यांची या बाबत उदासिनता दिसुन येत होती.शेवटी शिवसेनेच्या पदाधिकारी यांनी खा संजय जाधव यांच्या कानी शेतक-यांची व्यथा मांडल्या मुळे जायकवाडी विभागाच्या कार्यकारी अधिकारी जोशी मॅडम यांना चांगलेच खडसावल्याची व्हिडीओ क्लिप पुन्हा व्हायरल झाली असुन मंगळवारी दुपार पर्यंत मानवत तालुक्यातील वझुर या शेवटच्या गावा पर्यंत पाणी जाईल असे आश्वासन कार्यकारी अभियंत्यांनी खा जाधव यांना दिल्याने शेतक-यां मधुन समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
पाथरी तालुक्याती दक्षिने कडील जवळपास पंधारा विस गावांना या पाट पाण्याचा फायदा होतो. सुरूवाती पासुनच या भागात वार्षिक सरासरीच्या ३० ते ४० टक्के पाऊस झाला आहे.शेतक-यांनी दुबार पेरणी केलेली पिके ही पावसाच्या खंडात करपुन गेली. ज्यांच्या कडे थोडे बहुत पाणी होते त्यांनी काही प्रमाणात पिके जोपासली तर काळ्या शार जमिनी वरील पिके आजही जमिनिशी रांगतांना शेतकरी हताश होऊन पाहात आहे. पाऊस नसल्याने पानवठे आटले आहेत.या विषयी जायकवाडी उपविभागाच्या अधिका-यांना शेतकरी विनवनी करून ही ते दाद देत न्हवते. सोमवारी लिंबा, लोणी.बु,जैतापुरवाडी, कान्सुर, पाथरी, देवनांद्रा बाभळगाव,फुलारवाडी, कान्सुर, बाभळगाव, डाकुपिंप्री येथील शेकडो शेतक-यांनी प्रशासनाला निवेदने दिली तरी पाऊस पडल्याचेच कारण ही मंडळी शेतक-यांना देत होती. या वेळी कृऊबासचे उपसभापती शाम धर्मे,शिवसेनेचे युवा नेते अमोल भाले,शिवसेनेचे पाथरी तालुका सोशल मिडियाचे प्रमुख रोहन कदम या नेते मंडळीं सह गावागावातील शेतक-यांनी महसुल प्रशासन आणि जायकवाडी उपविभागाला निवेदने दिली. असे असतांनाही प्रशासनाची मात्र या बाबत उदासीनताच दिसुन येत होती. या विषयी शिवसेना (उबाठा) चे उपजिल्हा प्रमुख रविंद्र धर्मे,रावसाहेब निकम यांनी थेट खा संजय जाधव यांची भेट घेत या विषयाचं गांभिर्य सांगताच खा जाधव यांनी कार्यकारी अभियंत्या जोशी यांना फोन करून चांगेच धारेवर धरत जे उपाशी आहेत मागणी करत आहेत त्यांना आगोदर द्या असे सांगुन कधी पर्यंत बी ५९ चे पाणी शेवटाला जाईल ते सांगा असे खडसावताच उद्या मंगळवारी दुपार पर्यंत पाणी टेल जाईल असे सांगीले. जायकवाडीच्या पाण्या साठी खा जाधव यांनी दोन वेळा अधिका-यांना फैलावर घेतल्याने आता देवनांद्रा येथुन बी ५९ चारीला पाणी सोडण्याच्या हालचालींना वेग आला असुन या पाण्या साठी ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले त्या सर्वांचे शेतक-यांनी आभार मानले आहेत....
0 टिप्पण्या